Citigroup To Cut 20,000 Jobs In Next 2 Years  Sakal
Personal Finance

Citigroup Layoff: सिटीग्रुपचा मोठा निर्णय! पुढील दोन वर्षात 20 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार

Citigroup Layoffs: सिटी ग्रुप येत्या दोन वर्षात 20 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. चौथ्या तिमाहीत 1.8 अब्ज डॉलरचा तोटा झाल्याची माहिती दिल्यानंतर बँकेने हा निर्णय घेतला आहे. मुख्य वित्तीय अधिकारी मार्क मेसन यांनी सांगितले की, कंपनीचे सध्या जगभरात 2,39,000 कर्मचारी आहेत.

राहुल शेळके

Citigroup Layoffs: सिटीग्रुप येत्या दोन वर्षात 20 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. चौथ्या तिमाहीत 1.8 अब्ज डॉलरचा तोटा झाल्याची माहिती दिल्यानंतर बँकेने हा निर्णय घेतला आहे. मुख्य वित्तीय अधिकारी मार्क मेसन यांनी सांगितले की, कंपनीचे सध्या जगभरात 2,39,000 कर्मचारी आहेत.

नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेन फ्रेशर आल्यापासून सिटीग्रुपने आपल्या व्यवसायाची पुनर्रचना करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीचे उद्दिष्ट खर्च कमी करणे आणि भागधारकांना परतावा वाढवणे आहे.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन फ्रेशर म्हणाले की, 2023 हे वर्ष अपेक्षेप्रमाणे गेले नाही आणि 2024 हे वर्ष आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पुढील दोन वर्षांत बँक मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना करणार आहे, ज्याद्वारे एकूण 2.5 अब्ज डॉलरची बचत करण्याचे नियोजन केले आहे.

सिटीग्रुपने शुक्रवारी, 12 जानेवारी रोजी एका निवेदनात म्हटले आहे की, 2024 मध्ये त्यांचा एकूण खर्च 53.5 ते 53.8 बिलियन डॉलर दरम्यान असू शकतो.

ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करताना, सिटीग्रुपने सांगितले होते की, या कालावधीत त्यांना 1.8 अब्ज डॉलरचा तोटा झाला आहे, जे गेल्या 14 वर्षांतील बँकेचे सर्वात खराब निकाल आहेत. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत बँकेचा महसूल 3 टक्क्यांनी घसरला आहे.

कंपनीने गेल्या वर्षी एकूण 7,000 नोकऱ्या कमी केल्या

गेल्या वर्षभरात जगभरातील आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर लोकांना नोकरीवरून काढून टाकले आहे. Amazon, Microsoft, Twitter, Meta आणि Google या सर्वांनी हजारो लोकांना कामावरून काढून टाकले आहे.

बँकिंग क्षेत्रातील कंपनी सिटी ग्रुपनेही अनेक विभागातील लोकांना कामावरून काढून टाकले होते. कंपनीने गेल्या वर्षीभरात एकूण 7,000 नोकऱ्या कमी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI BR Gavai यांनी असा निकाल दिला की इतर न्यायाधीश संतापले, नेमकं प्रकरण काय होतं? जोरदार झाला वादविवाद

आशियाई विजेत्या भारतीय तिरंदाजांची अवहेलना; १० तास विमानतळावर अडकले; अस्वच्छ धर्मशाळेत वास्तव्य...

Grain Scam:'शासकीय धान्याचा ८७ लाखांचा अपहार'; फलटण तालुक्यातील धक्कादायक प्रकार, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ..

मोठी बातमी! शैक्षणिक सहलींसाठी विद्यार्थ्यांसाठी सहलीत ५० टक्के सवलत; प्रत्येकास १० लाखांचा अपघात विमाही; एसटी महामंडळाचे आगारप्रमुख जाणार शाळांमध्ये

आजचे राशिभविष्य - 19 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT