Cricketers signed half a dozen endorsement, investment, and collaboration deals during IPL 2024  Sakal
Personal Finance

IPL 2024: बोले जो कोयल... आयपीएलचं वातावरण तापल्यामुळे दिग्गज खेळाडूंची होतेय चांदी, नव्या जाहिरातींनी केले मालामाल

IPL 2024: दिवसेंदिवस इंडियन प्रीमियर लीग 2024 ची क्रेझ वाढत आहे. चाहत्यांना लीगमधील रोमांचक सामने दररोज पाहायला मिळत आहेत. या रोमांचक सामन्यांदरम्यान प्रेक्षक संख्याही वाढली आहे.

राहुल शेळके

IPL 2024: दिवसेंदिवस इंडियन प्रीमियर लीग 2024 ची क्रेझ वाढत आहे. चाहत्यांना लीगमधील रोमांचक सामने दररोज पाहायला मिळत आहेत. या रोमांचक सामन्यांदरम्यान प्रेक्षक संख्याही वाढली आहे. यामुळे विविध क्रिकेटपटूंनी किमान अर्धा डझन गुंतवणूक आणि करारावर सह्या केल्या आहेत.

चेन्नई सुपर किंग्सचा स्टार खेळाडू एमएस धोनीने न्यूट्रिशन स्टार्टअप एक्सप्लोसिव्ह व्हे सोबत करार केला आहे. तसेच फ्रेंच कारमेकर सिट्रोएन आणि एमक्यूर फार्मास्युटिकल्सने देखील गुंतवणूक केली आहे. फिलिप्स कंपनीने विराट कोहलीसोबत करार केला आहे.

Wearables brand boAt ने यशस्वी जैस्वाल सोबत करार केला आहे. शिखर धवनला आयवेअर स्टार्ट-अप QUE ने गुंतवणूकदार आणि ब्रँड अ‍ॅम्बेसेडर केले आहे.

टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोहली किंवा धोनीसारख्या आघाडीच्या खेळाडूंसाठी वर्षाला 3-5 कोटी रुपये आणि नवीन खेळाडूंसाठी 75 लाख ते 1 कोटी रुपयांचे करार केले जात आहेत.

ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल (BARC) च्या डेटाचा हवाला देऊन आयपीएल टेलिव्हिजन प्रसारण हक्क असलेल्या डिस्ने स्टारने 9 मे रोजी सांगितले की, स्पर्धेच्या पहिल्या 51 सामन्यांमध्ये प्रेक्षक संख्या 510 दशलक्ष पर्यंत पोहोचली आहे. 2019 पेक्षा ही संख्या 5% वाढली आहे आणि IPL 2023 पेक्षा आतापर्यंत एकूण सामना पाहण्याच्या वेळेत 18% वाढ झाली आहे.

नवीन करारा व्यतिरिक्त, काही ब्रँडने त्यांच्याशी संबंधित असलेल्या खेळाडूंसह नवीन जाहिराती केल्या आहेत. ओकले कंपनीने मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्मासोबत एक जाहिरात केली आहे. एअर कंडिशनर कंपी ब्लू स्टारने कोहलीसोबत नवीन जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या वाढत्या प्रेक्षक संख्येमुळे खेळाडूंना प्रसिद्धी आणि पैसा मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ३१ धोत्रे खून प्रकरणात पोलिसांना शरण आलेल्या उद्धव निमसेंना २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT