insurance
insurance  Sakal
Personal Finance

विमा क्षेत्रातील ग्राहकाभिमुख बदल

सुधाकर कुलकर्णी

नुकतेच म्हणजे एक एप्रिल २०२४ पासून भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) आयुर्विमा व इतर विम्यांबाबत काही ग्राहकाभिमुख बदल केले आहेत, यामुळे विमाधारकांची सोय होणार आहे.

१) आता नव्याने मिळणारी कोणतीही विमा पॉलिसी डिजिटल स्वरूपात आपल्या ‘ई-इन्शुरन्स अकाउंट’मध्ये (ई-आयए) मिळणार आहे.

अशा डिजिटल पॉलिसी कार्व्ही, कॅम्स, एनडीएमएल, सेंट्रल इन्शुरन्स रिपॉझिटरी या चार रिपॉझिटरीमार्फत दिल्या जातील. थोडक्यात, नव्याने मिळणारी कोणतीही विमा पॉलिसी आता डिजिटल स्वरूपात वरील चारपैकी एका रिपॉझिटरीच्या ‘ई-इन्शुरन्स अकाउंट’मध्ये दिली जाईल.

त्यासाठी नवी पॉलिसी घेताना वरील चारपैकी कोणत्या रिपॉझिटरीकडे आपल्याला ‘ई-इन्शुरन्स अकाउंट’ हवे आहे ते कळवावे लागते, त्यानुसार संबंधित विमा कंपनी आपले खाते उघडते. आपले आधीच असे खाते असेल, तर तसे नवी पॉलिसी घेताना संबंधित विमा कंपनीस कळवावे लागते. म्हणजे नव्याने देण्यात येणारी विमा पॉलिसी आपण दिलेल्या खात्यामध्ये डिजिटल स्वरूपात दिली जाते.

खाते उघडणे सुलभ

  •  कोणत्याही एका रिपॉझिटरीवर ‘ई-इन्शुरन्स अकाउंट’ आपण स्वत:ही उघडू शकतो.

  •  रिपॉझिटरीच्या वेबसाइटवर फॉर्म उपलब्ध असतो.

  •  ‘केवायसी’ पूर्ततेसाठी आवश्यक डॉक्युमेंटचा तपशीलही असतो.

  •  हे खाते ऑनलाइन किंवा ऑफलाइनदेखील उघडता येते.

  •  एका व्यक्तीस एकच खाते; तसेच हे खाते एकाच नावाने उघडता येते.

  •  संयुक्त नावाने हे खाते उघडता येत नाही.

  •  खाते उघडण्यासाठी काहीही खर्च येत नाही.

  •  सध्या आपल्याकडे असलेल्या सर्व विमापॉलिसी (आयुर्विमा पॉलिसी, वाहनविमा, आरोग्यविमा) डिजिटल स्वरूपात रूपांतरीत करता येतात.

‘ई-इन्शुरन्स अकाउंट’चे फायदे

  •  आपल्या सर्व विमा पॉलिसी एकाच खात्यात डिजिटल स्वरूपात असल्याने हरवणे, फाटणे, खराब होणे ही शक्यता उरत नाही.

  •  सर्व पॉलिसींची माहिती एकाच ठिकाणी सहजगत्या उपलब्ध असते.

  •  नॉमिनेशन, पत्ता, फोन क्रमांक, मोबाइल क्रमांकातील बदल एकाच ठिकाणी केले जातात. सर्व पॉलिसीमध्ये तो एकाचवेळी आपोआप होत असतो.

  •  प्रत्येक नव्या पॉलिसीसाठी नव्याने ‘केवायसी’ पूर्तता करावी लागत नाही.

  • महत्त्वाचे अन्य बदल

  • ‘फ्री लूक-अप पिरीयड’मध्ये वाढ

  • विमा पॉलिसींबाबतचा या आधीचा १५ दिवसांचा ‘फ्री लूक-अप पिरीयड’ आता वाढवून ३० दिवस केला आहे, यामुळे पॉलिसी मिळाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत आपणास नको असलेली पॉलिसी रद्द करता येणार आहे.

आयुर्विमा पॉलिसीची सरेंडर व्हॅल्यू

  •  पॉलिसी घेतल्यापासून दुसऱ्या वर्षात सरेंडर केल्यास भरलेल्या एकूण प्रीमियमच्या ३० टक्के सरेंडर व्हॅल्यू असेल.

  •  पॉलिसी घेतल्यापासून तिसऱ्या वर्षात सरेंडर केल्यास भरलेल्या एकूण प्रीमियमच्या ३५ टक्के सरेंडर व्हॅल्यू असेल.

  •  पॉलिसी घेतल्यापासून चार ते सात वर्षांदरम्यान सरेंडर केल्यास भरलेल्या एकूण प्रीमियमच्या ५० टक्के सरेंडर व्हॅल्यू असेल.

  •  पॉलिसी कालावधीच्या शेवटच्या दोन वर्षांत सरेंडर केली, तर भरलेल्या एकूण प्रीमियमच्या ९० टक्के सरेंडर व्हॅल्यू असेल.

  •  पॉलिसी सात वर्षांनंतर परंतु, शेवटच्या दोन वर्षांच्या आधी सरेंडर केल्यास सरेंडर व्हॅल्यू भरलेल्या एकूण प्रीमियमच्या किती टक्के असेल, याचा यात अद्याप उल्लेख नाही.

  • ग्राहकहिताच्या दृष्टीने करण्यात आलेल्या

  • या नव्या बदलांमुळे पॉलिसीधारकांची सुविधा निश्चितच वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT