Deduction of TDS and TCS  esakal
Personal Finance

Deduction of TDS and TCS : पगारातून TCS, TDS कापला म्हणजे ते पैसे बुडालेले नाहीत, असे मिळवा हक्काचे पैसे परत

काही गोष्टी करून तुमच्या पगारातून कट झालेल्या TDS आणि TCS ची रक्कम परत मिळवता येऊ शकते

सकाळ डिजिटल टीम

Deduction of TDS and TCS : 

इनकम टॅक्स भरत असताना किंवा टॅक्स संदर्भात कोणतीही चर्चा करताना, TCS,TDS हे शब्द कानी पडतात. माझा यावेळी इतका TDS कट झाला, असे बोलले जाते. पण हे शब्द नक्की आहेत काय. TDS,TCS  कट झाले तर ते बुडतात का? ते  आपल्याला परत मिळवता येतात का? याबद्दलच आज आपण माहिती घेऊयात.

आर्थिक वर्ष 2023-24 पासून काही अटींसह 7 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कोणत्याही व्यक्तीला कर भरण्यापासून किंवा कर रिटर्न भरण्यापासून सूट दिली आहे. जुन्या कर प्रणालीनुसार, वार्षिक अडीच लाख रुपये किंवा त्याहून अधिक कमाई करणाऱ्यांसाठी आग्रिम कर भरणे अनिवार्य होते. (Deduction of TDS and TCS)

टॅक्स भरताना अनेकवेळा TDS ,TCS कापला जातो. लोकांचा असा विश्वास आहे की एकदा तुमचा TDS किंवा TCS कापला की तो परत येणार नाही. पण असं नाही. काही गोष्टी करून तुमच्या पगारातून कट झालेल्या TDS आणि TCS ची रक्कम परत मिळवता येऊ शकते. त्यासाठी काय करावे, कोणती पद्धत वापरावी याबद्दल माहिती घेऊयात.

आपले पगार, कमिशन, भाडे, व्याज, व्यावसायिक फी, शेअर डिव्हिडंड, क्रिप्टो करन्सी इत्यादी काही देयके केली जातात तेव्हा यावर कर वजा (TDS) केला जातो. कंपनी किंवा व्यक्ती जी TDS कापत आहे त्यांना डिडक्टर म्हणतात. तर पेमेंट प्राप्त करणाऱ्या कंपनी किंवा व्यक्तीला डिडक्टी  म्हणतात.

टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स (TCS) हा विक्रेत्याद्वारे देय असलेला कर आहे, जो तो वस्तूंच्या विक्रीच्या वेळी खरेदीदाराकडून वसूल करतो. आयकर कायद्याच्या कलम 206 मध्ये विक्रेत्यांनी खरेदीदारांकडून कर वसूल करणे आवश्यक असलेल्या वस्तूंच्या सूचीचा उल्लेख आहे.

TDS,TCS परत कसा मिळवायचा?

तुमचे वार्षिक उत्पन्न 7 लाखांहून कमी असेल तर तुम्ही टीडीएस/टीसीएस रिफंड क्लेम करू शकता.  हा रिफंड मिळवण्यासाठी, तुम्हाला आयकर रिटर्न भरावे लागेल.

तुमचे आयकर रिटर्न भरल्यानंतर आणि पडताळणी केल्यानंतर, तुम्ही कमी उत्पन्न गटात असाल तर, तुम्ही TDS आणि TCS चे होणारे कटींग थांबवण्यासाठी फॉर्म 15G/TCS भरू शकता.

तुमच्या व्यवहारांवर TDS आणि TCS लागू होत नाहीत. तुमच्या कमी उत्पन्नाच्या पुराव्यासाठी तुम्ही आयकर विभागाला दुसरा घोषणापत्र देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: अमेरिकेच्या हल्ल्यानंतर कच्चे तेल महागले; आता पेट्रोल-डिझेल कितीला? महाराष्ट्रातील शहरनिहाय नवे दर जाहीर

Shaktipeeth Highway Drone Survey : ‘शक्तिपीठ’ महामार्गासाठी विठ्यात ‘ड्रोन सर्व्हे’, शेतकऱ्यांनी प्रशासनाला दाखवला हिसका; सांगलीत वातावरण तापलं

Latest Marathi News Live Update : 'गोकुळ' प्रशासक नियुक्तीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर आज सुनावणी

Pakistan Occupied Kashmir: पाकव्याप्त काश्मीरमध्ये तणाव शिगेला; धुमश्‍चक्रीत ११ जणांचा मृत्यू, ब्रिटिश खासदारांकडून चिंता व्यक्त

Maharashtra Education : चौथीच्या पुस्तकात मोठा बदल! छत्रपती शिवरायांच्या इतिहासासोबतच जोडले 'हे' खास पान; संत, थोर समाजपुरुषांच्या कार्यांची विद्यार्थ्यांना होणार ओळख

SCROLL FOR NEXT