Deutsche Bahn Layoffs Sakal
Personal Finance

Deutsche Bahn Layoffs: जर्मन रेल्वे कंपनीचा मोठा निर्णय! 30 हजार कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

Deutsche Bahn Layoffs: जर्मन रेल्वे कंपनीने कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. ड्यूश बान नावाच्या कंपनीने 30 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. कंपनीने केलेल्या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांचे चिंता वाढली आहे.

राहुल शेळके

Deutsche Bahn Layoffs: जर्मन रेल्वे कंपनीने कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. ड्यूश बान नावाच्या कंपनीने 30 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. कंपनीने केलेल्या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांचे चिंता वाढली आहे. कर्मचाऱ्यांना आता नवीन नोकरी शोधण्याची चिंता आहे. जर्मन कंपनीने घेतलेल्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.

एकाच वेळी 30 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

जर्मन रेल्वे कंपनी ड्यूश बानने अचानक 30 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला, ही मोठी गोष्ट आहे. यामागचे कारण असे सांगितले जाते की, आर्थिक संकटाच्या काळात कंपनीला रेल्वेचे कामकाज सुरळीत करण्यासाठी आणि एकूण खर्च कमी करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागला. कॉस्ट कटिंगसाठी कंपनीसमोर हाच पर्याय उरला आहे.

पहिल्या 6 महिन्यांत 1.2 अब्ज नुकसान

माहितीनुसार, पहिल्या सहामाहीत कंपनीला 1.2 बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी कंपनीला कॉस्ट कटिंगचा निर्णय घ्यावा लागला. खर्च कपातीचा भाग म्हणून कंपनीने 30 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीही अनेकवेळा कंपन्यांनी तोटा भरून काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.

जर्मन रेल्वे कंपनीतून कामावरून काढून टाकल्यानंतर कर्मचारी कुठे जाणार? ताबडतोब नोकरी मिळवणे या सर्व कर्मचाऱ्यांसाठी इतके सोपे नाही. अलीकडे डायसन, टेस्ला, पेटीएम, गुगल यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. असा निर्णय घेण्यामागे या कंपन्यांनी नुकसान भरपाईचे कारणही सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT