Indian Oil sakal
Personal Finance

Indian Oil : इंडियन ऑइलच्या निर्यातीत मोठी वाढ; आता श्रीलंकेतील बाजारपेठ करणार काबीज

भारतातील ऊर्जा क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी इंडियन ऑइलने हाय-एंड वाहनांसाठी तयार केलेले, एक्सपी-१०० हे उच्च दर्जाचे विशेष इंधन आज श्रीलंकेला जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथून निर्यात केले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतातील ऊर्जा क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी इंडियन ऑइलने हाय-एंड वाहनांसाठी तयार केलेले, एक्सपी-१०० हे उच्च दर्जाचे विशेष इंधन आज श्रीलंकेला जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथून निर्यात केले.

इंडियन ऑइलच्या स्वदेशी ऑक्टामॅक्स तंत्रज्ञानाच्या आधारे ऑक्टेन पेट्रोल एक्सपी १०० हे देशांतर्गत विकसित करण्यात आलेले उच्च दर्जाचे इंधन असून, ते इंजिनाची कार्यक्षमता, वेग, सुधारित इंधनक्षमता सुदारते. ते उत्सर्जन कमी करते तसेच वाहनाची देखभाल कमी करते.

या कार्यक्रमाला जेएनपीटीच्या वाहतूक विभागाचे संचालक गिरीश थॉमस, इंडियन ऑइलचे संचालक (विपणन) व्ही. सतीश कुमार, लंका आयओसीचे अध्यक्ष सुजॉय चौधरी, लंका आयओसी, इंडियन ऑइलचे कर्मचारी आणि बंदर अधिकारी उपस्थित होते. यावेळी व्ही. सतीश कुमार यांनी या निर्यातीला हिरवा झेंडा दाखवला.

ते म्हणाले,‘‘आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा प्रसंग आहे, कारण आमची आणखी एक उत्पादने श्रीलंकेतील नवी बाजारपेठ जिंकण्यासाठी पुढे येत आहेत. भारतातून दर्जेदार उत्पादने जगाला पाठवण्याची आमची क्षमता दर्शवून आम्ही तिसऱ्यांदा उत्पादन पाठवत आहोत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT