Free Bus Tickets For Ayodhya Paytm Announces Mega Offer For Devotees Traveling To Ayodhya  Sakal
Personal Finance

Ram Mandir Ayodhya: अयोध्येला जाण्यासाठी मोफत बस सेवा; कसे मिळवायचे तिकीट जाणून घ्या

Free Ticket for Ayodhya: राम मंदिर सोहळ्यासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येला पोहोचत आहेत. तुम्हालाही यानिमित्ताने अयोध्येला जायचे असेल तर बसचे मोफत तिकीट मिळू शकते.

राहुल शेळके

Free Ticket for Ayodhya: राम मंदिर सोहळ्यासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येला पोहोचत आहेत. तुम्हालाही यानिमित्ताने अयोध्येला जायचे असेल तर बसचे मोफत तिकीट मिळू शकते. पेटीएम या आघाडीच्या मोबाईल वॉलेट कंपनीने बसचे मोफत तिकीट देण्याची घोषणा केली आहे.

One97 Communications Limited (OCL)ने अयोध्येला जाण्यासाठी मोफत बस तिकीट सेवा सुरू केली आहे. ही कंपनी पेटीएमच्या मालकीची आहे. 22 जानेवारी रोजी राम मंदिर सोहळ्यासाठी बसने अयोध्येला जाण्याची योजना आखत असलेल्या भाविकांसाठी विशेष ऑफर जाहीर केली आहे. ही योजना आजपासून म्हणजेच 19 जानेवारीपासून सुरू होत आहे.

मोफत तिकीट कसे मिळवायचे

पेटीएमकडून मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येला मोफत बसचे तिकीट मिळवण्यासाठी त्यांना पेटीएम अॅपद्वारे तिकीट बुक करावे लागेल. या अॅपवरील पहिल्या 1,000 प्रवाशांना मोफत बस तिकिटे मिळतील. यासाठी त्यांना ‘BUSAYODHYA’ हा प्रोमो कोड वापरावा लागेल. ही विशेष ऑफर 19 जानेवारीपासून उपलब्ध आहे. (How to get free tickets)

पेटीएमने थेट बस ट्रॅकिंग सेवा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. प्रवाशांनी त्यांच्या बुक केलेल्या बसचे रिअल-टाइम स्थान त्यांच्या जवळच्या लोकांना दिसणार आहे.

अयोध्या रेल्वे स्थानकापासून राम मंदिर किती अंतरावर आहे?

जर तुम्ही ट्रेनने अयोध्येला पोहोचत असाल तर रेल्वे स्टेशनपासून फक्त पाच किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर तुम्ही राम मंदिरात पोहचू शकता. याशिवाय मुंबई, पुणे, नागपूर, लखनौ आणि दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांमधून थेट बससेवेद्वारेही अयोध्येला जाता येते. (How far is Ram temple from Ayodhya railway station?)

विमानाने अयोध्येला कसे जायचे?

अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम श्री राम विमानतळ आहे. राममंदिर आणि विमानतळामध्ये सुमारे 10 किलोमीटरचे अंतर आहे. इंडिगोतर्फे येथे विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. (How to reach Ayodhya by plane?)

सध्या दिल्ली आणि अहमदाबाद येथून अयोध्येला जाणारी विमाने उपलब्ध असतील. शेजारच्या लखनौ, गोरखपूर आणि वाराणसीच्या विमानतळांवर उतरून तुम्ही बस आणि ट्रेनने अयोध्येला पोहोचू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT