Gold and Silver Rate Sakal
Personal Finance

Gold Rate: सोन्याने घेतली मोठी झेप; एकाच दिवसात मोडला महिन्याचा विक्रम, चांदीचे भावही भिडले गगनाला

Gold and Silver Rate: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांना वाटत होते. पण, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे.

राहुल शेळके

Gold and Silver Rate: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे ग्राहकांना वाटत होते. पण, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे.

मंगळवारी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आणि एकाच दिवसात सोने 1400 रुपयांनी वाढले. सोन्याने एका महिन्यात सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. चांदीच्या भावातही 3100 रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्याचा भाव 1400 रुपयांनी तर चांदीचा भाव 3150 रुपयांनी वाढला

जागतिक मागणीमुळे मंगळवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 1,400 रुपयांनी वाढून 74,150 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. शुक्रवारी शेवटच्या व्यवहारात सोने 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. चांदीचा भावही 3,150 रुपयांनी वाढून 87,150 रुपये प्रति किलोवर बंद झाला, तर त्याची पूर्वीची किंमत 84,000 रुपये प्रति किलो होती.

आयात शुल्कात कपात करण्याच्या घोषणेनंतर भावात सातत्याने घसरण

2024-25 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावरील आयात शुल्कात कपात केल्याची घोषणा केल्यानंतर सोन्याचे भाव सातत्याने घसरत आहेत. 23 जुलै रोजी सोन्याचा भाव 3,350 रुपयांनी घसरून 72,300 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता.

दरम्यान, दिल्लीत, 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्धतेचे सोने मागील बंद किमतीच्या तुलनेत 1,400 रुपयांनी वाढून अनुक्रमे 74,150 रुपये आणि 73,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले.

ज्वेलर्सकडून वाढत्या मागणीमुळे भावात वाढ

स्थानिक ज्वेलर्सकडून वाढत्या मागणीसह मजबूत जागतिक ट्रेंडमुळे सोन्याच्या भावात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जागतिक स्तरावर सोने प्रति औंस 18.80 डॉलरने वाढून 2,560.10 डॉलर प्रति औंस व्यवहार करत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव 30.19 प्रति औंस झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT