Gold investment on Akshaya Tritiya muhurat significance Sakal
Personal Finance

Akshaya Tritiya 2024 : अक्षय तृतीयेची सुवर्णगुंतवणूक

भारतीय संस्कृतीत अक्षय तृतीया ही साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक आहे. या शुभमुहूर्तावर सोनेखरेदी आवर्जून केली जाते.

सकाळ वृत्तसेवा

- किरांग गांधी

भारतीय संस्कृतीत अक्षय तृतीया ही साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक आहे. या शुभमुहूर्तावर सोनेखरेदी आवर्जून केली जाते. नव्या कामाची सुरुवात करण्यासाठीही हा मुहूर्त साधला जातो. सोनेखरेदीची ही परंपरा केवळ श्रद्धा आणि संस्कृतीपुरती मर्यादित नसून, त्यातून गुंतवणुकीकडे पाहण्याचा व्यावहारिक दृष्टिकोनही मिळतो.

कोणत्याही शुभमुहूर्तावर किंवा लग्न, मुंज, वाढदिवस अशा शुभप्रसंगीही सोन्याचे दागिने खरेदी केले जातात. दागिने खरेदी करणे हा सोने खरेदी करण्याचा पारंपरिक मार्ग आहे. दागिन्यांच्या स्वरूपात केलेली सोन्याची खरेदी ही केवळ गुंतवणूक नसते, तर तिच्याकडे सामाजिक प्रतिष्ठेचे चिन्ह म्हणूनही बघितले जाते.

गुंतवणूक म्हणून सोनेखरेदी करताना नाणी, वळी, बार किंवा बिस्कीट स्वरुपात घेतले जाते. यामुळे ते विकताना घडणावळ, घट असे नुकसान होत नाही. या पारंपरिक मार्गांशिवाय आता गोल्ड ईटीएफ, गोल्ड बाँड, डिजिटल गोल्ड, म्युच्युअल फंड असे पर्याय उपलब्ध आहेत. अक्षय तृतीयेनिमित्त सोन्यात गुंतवणूक करण्याचे काही आधुनिक पर्याय आणि त्यांचे फायदे-तोटे जाणून घेऊ या.

गोल्ड ईटीएफ

डीमटेरियलाईज्ड किंवा कागदी स्वरूपात असणाऱ्या सोन्याचे निदर्शक म्हणून ‘गोल्ड ईटीएफ’चा वापर केला जातो. सामान्यतः एक ‘ईटीएफ’ युनिट म्हणजे एक ग्रॅम सोने होय. हे ‘गोल्ड ‘ईटीएफ’ युनिट स्टॉक एक्स्चेंजमध्ये कधीही खरेदी किंवा विक्री करता येतात.

सॉव्हरिन गोल्ड बाँड

भारत सरकारने सोन्यातील गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय सार्वभौम सुवर्णरोख्यांच्या (सॉव्हरिन गोल्ड बाँड) माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात हे रोखे जतन केले जातात आणि सोन्याच्या सुरुवातीच्या किमतीवर ठरावीक व्याजही दिले जाते. या रोख्यांची मुदत आठ वर्षे असते. यावर करसवलतही मिळते.

डिजिटल सोने

सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी अलीकडच्या काळात लोकप्रिय झालेला पर्याय म्हणजे डिजिटल गोल्ड. याची ऑनलाइन खरेदी करता येते. हे सोने विक्रेते एका सुरक्षित व्हॉल्टमध्ये ठेवतात. डिजिटल गोल्ड हवे तेव्हा खरेदी करता येते आणि विकताही येते. काही काळानंतर त्याचा साठा गुंतवणूकदाराकडे तयार होतो, त्यामुळे हा गुंतवणुकीसाठी सोयीस्कर पर्याय मानला जातो.

गोल्ड म्युच्युअल फंड

गोल्ड म्युच्युअल फंड हे सोन्याच्या खाणी चालवणाऱ्या कंपन्या व ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये गुंतवणूक करतात. प्रत्यक्ष सोने विकत न घेता सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना हा म्युच्युअल फंडाचा सोपा पर्याय उपलब्ध आहे.

कोणत्याही स्वरूपातील सोनेखरेदी करण्याचा निर्णय घेताना, तो तुमच्या गुंतवणुकीच्या नियोजनाशी, आर्थिक उद्दिष्टांशी सुसंगत असणे आवश्‍यक आहे. त्या गुंतवणुकीतील जोखमीचाही विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना आर्थिक क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घेणे उत्तम ठरू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: बनावट विमा आणि एनपीएस विकणे महागात पडणार! रिझर्व्ह बँकेकडून कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी; कारवाई काय होणार?

Tukaram Mundhe: बोगस दिव्यांगांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारवाई होणार?

World Record : भारताने मोडला रिकी पाँटिंगच्या ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात अशी अविश्वसनीय कामगिरी करणारी पहिली टीम

Viral Video: धावत्या ट्रेनमधील स्टंटवर नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले धाडस की..! पाहा व्हायरल व्हिडिओ

IND vs PAK: भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचं 'धुरंधर' स्टाईल सेलिब्रेशन अफगाणिस्तान अन् बलुचिस्तानमध्ये? Video होतायेत Viral

SCROLL FOR NEXT