Gold Rate
Gold Rate sakal
Personal Finance

Gold Rate: गुढीपाडव्या निमित्त सोन्याला झळाळी; भाव ७१,७०० रुपयांवर, चांदीही चमकली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मागणीत वाढ झाल्यामुळे आज सोन्याचा भाव नवी दिल्लीत प्रति दहा ग्रॅममागे ३५० रुपयांनी वाढून ७१,७०० रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला.

नव्या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या भावात उल्लेखनीय वाढ झाली असून, आतापर्यंत प्रति दहा ग्रॅममागे ७७०० रुपयांनी सोने महागले आहे. चांदीचा भावही प्रति किलो ८०० रुपयांनी वाढून ८४,००० रुपयांच्या नव्या उच्चांकावर गेला.

पुणे सराफी बाजारपेठेतही शुद्ध सोन्याचा भाव आज प्रति दहा ग्रॅममागे ७१,२०० रुपये झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या कमोडिटीज विभागाचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले, ‘‘दिल्लीच्या बाजारपेठेत स्पॉट सोन्याच्या किमती (२४ कॅरेट) ७१,७०० रुपये प्रति दहा ग्रॅमच्या विक्रमी उच्चांकावर व्यवहार करत आहेत, ज्यामुळे विदेशी बाजारात तेजीचे संकेत आहेत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT