Gold Rate Today in India Sakal
Personal Finance

Gold Rate: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोने 60,000 रुपयांच्यावर, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Gold Rate Today in India: नवरात्रीमध्ये 24 कॅरेट सोन्याने 60,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

राहुल शेळके

Gold Silver Price Today Latest Update 16 October 2023: देशभरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्रीमध्ये 24 कॅरेट सोन्याने 60,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. स्थानिक बाजारपेठेतील सोन्याची मागणी आणि इस्रायल-हमास युद्धामुळेही सोन्याच्या भावात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

देशातील सर्वच शहरांमध्ये सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यातील शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात 500 ते एक हजार रुपयांची वाढ दिसून आली. 22 कॅरेट सोन्याचा भाव 55 हजार रुपयांच्या वर तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,100 रुपयांच्या वर आहे. चांदीचा भाव 74,100 रुपये आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • हैदराबाद - 60,110 रुपये

  • कोलकत्ता - 60,110 रुपये

  • गुरुग्राम - 60,260 रुपये

  • मुंबई - 60,110 रुपये

  • पुणे - 60,110 रुपये

  • पटना - 60,160 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी :

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गामुळे किंग कोब्रा, पट्टेरी वाघ, गवे, हत्ती, बिबट्यांना धोका, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तीव्र विरोध, कसा असेल मार्ग

Breaking News Live Update: राहुरीत अपक्ष उमेदवाराचा सायकलवर प्रचार; सुजय विखेंचीही घेतली भेट

Pune Politics News: शरद पवारांचा लवकरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा दौरा; नव्याने पक्ष संघटना उभारणीसाठी देवदत्त निकम यांच्यासोबत चर्चा

Asha Bhosle Video : 'या' शाळेत झालं आहे आशा भोसले यांचं शिक्षण, स्वतः व्हिडिओ शेअर करत सांगितल्या होत्या कोल्हापूरच्या गोड आठवणी

Gold Silver Price Impact War : सोने चांदी दरावर अद्याप युद्धाचा परिणाम, आठवड्यातील दराची आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT