Today's Gold Silver Price Updates
Today's Gold Silver Price Updates sakal media
Personal Finance

Gold Rate : एकादशीच्या दिवशी सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

सकाळ डिजिटल टीम

Today's Gold Silver Price : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात तेजी आणि चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. आजसुद्धा सोन्याच्या दरात तेजी आणि चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. आज आमलकी एकादशीच्या निमित्त्याने सोने खरेदी करण्याकडे सर्वांचा कल असणार.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 51,750 तर 24 कॅरेट साठी 56,750 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 665 रुपये आहे. (gold silver price update 3 March 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 57,200 रुपये

  • दिल्ली - 56,600 रुपये

  • हैदराबाद - 56,450 रुपये

  • कोलकत्ता - 56,450 रुपये

  • लखनऊ -54,600 रुपये

  • मुंबई - 56,450 रुपये

  • नागपूर - 56,450 रुपये

  • पुणे - 56,450 रुपये

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT