Gold-Silver Price : खुशखबर! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; 550 रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या नवे दर

सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा घसरण झाली आहे.
Gold-Silver Price
Gold-Silver PriceSakal

Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा घसरण झाली आहे. सोन्याचा भाव आज 110 रुपयांनी आणि चांदी 550 रुपयांनी कमी झाली.

एचडीएफसी सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, या घसरणीनंतर दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 55,550 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. चांदीचा भाव आज 63,000 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला.

सध्या, गोल्ड प्राइस वेबसाइटवर स्पॉट सोन्याची किंमत 1808 डॉलर प्रति औंस आहे, तर चांदीची किंमत 20.59 डॉलर प्रति औंस आहे.

रिलायन्स सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक श्रीराम अय्यर यांनी पीटीआयच्या अहवालात सांगितले की, फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढविण्याबाबत अजूनही सक्रिय असल्याने आज सोन्याच्या किंमतीवर दबाव आहे.

अमेरिकन अर्थव्यवस्थेशी संबंधित महत्त्वाची आकडेवारी या आठवड्यात येणार आहे. या डेटाचा थेट किंमतीच्या दरांवर परिणाम होईल.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - 56,800 रुपये

  • दिल्ली - 56,270 रुपये

  • हैदराबाद - 56,120 रुपये

  • कोलकत्ता - 56,120 रुपये

  • लखनऊ - 56,270 रुपये

  • मुंबई - 56,120 रुपये

  • पुणे - 56,120 रुपये

Gold-Silver Price
Mahindra Lifespace Developers : या रियल इस्टेट स्टॉकने गुंतवणुकदारांना केले मालमाल

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Gold-Silver Price
कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.

24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com