GST Collection July 2023 Sakal
Personal Finance

GST Collection: जुलै 2023 मध्ये विक्रमी जीएसटी संकलन, महाराष्ट्राने भरली सर्वाधिक सरकारी तिजोरी

GST Collection July 2023: जीएसटी लागू झाल्यापासून संकलन वाढण्याची ही पाचवी वेळ आहे.

राहुल शेळके

GST Collection July 2023: जुलै 2023 मध्ये जीएसटी संकलन 1.65 लाख कोटी रुपये झाले आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 11 टक्क्यांनी अधिक आहे. देशात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी लागू झाल्यापासून संकलन वाढण्याची ही पाचवी वेळ आहे. संकलनाचा आकडा 1.6 लाख कोटींच्या वर गेला आहे.

अर्थ मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केली

अर्थ मंत्रालयाने जुलैमध्ये जीएसटी संकलनाचे आकडे जाहीर केले आहेत आणि गेल्या महिन्यातही प्रचंड संकलन झाले आहे. अर्थ मंत्रालयाकडून जीएसटी संकलन 1,65,105 कोटी रुपये झाल्याचे सांगण्यात आले आहे.

यामध्ये केंद्रीय GST (CGST) रु. 29,773 कोटी आणि राज्य GST (SGST) रु. 37,623 कोटी आणि IGST रु. 85,930 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 41,239 कोटी रुपयांसह) यांचा समावेश आहे. याशिवाय 11,779 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या 840 कोटी रुपयांसह) उपकर म्हणून जमा झाले आहेत.

संकलन वाढतच आहे

सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात CGST 39,785 कोटी रुपये आणि SGST 33,188 कोटी रुपये आहे. सरकारचा एकूण महसूल CGST साठी 69,558 कोटी रुपये आणि SGST साठी 70,811 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

गेल्या महिन्यात, जून 2023 मध्ये, देशाचे जीएसटी संकलन 1,61,497 कोटी रुपये होते, जे वार्षिक आधारावर 12 टक्के अधिक होते. तर मे 2023 मध्ये जीएसटी संकलनाचा आकडा 1,57,090 कोटी रुपये होता.

एप्रिल 2023 मध्ये विक्रमी संकलन झाले

देशात जीएसटी लागू झाल्यानंतर या वर्षी एप्रिल 2023 मध्ये सर्वाधिक जीएसटी संकलन झाले. हा आकडा 1.87 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. 2021-22 या आर्थिक वर्षात सरासरी मासिक GST संकलन 1.10 लाख कोटी रुपये होते.

तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ते 1.51 लाख कोटी रुपये होते आणि 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत सरासरी संकलन 1.69 लाख कोटी रुपये होते. जीएसटी संकलनात सातत्याने वाढ होत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल

जुलै 2023 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र टॉप 5 राज्यांमध्ये अव्वल आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात जीएसटी संकलन 18 टक्के वाढून 26,064 कोटी रुपये झाले आहे. या यादीत 11,505 कोटींच्या कलेक्शनसह कर्नाटक दुसऱ्या तर तामिळनाडू 10,022 कोटींच्या कलेक्शनसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT