GST Collection in August Sakal
Personal Finance

GST Collection: नवीन विक्रम! सप्टेंबरमध्ये 10% वाढीसह GST संकलन 1.62 लाख कोटी रुपयांवर

GST Collection in September 2023: सप्टेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र टॉप-5 राज्यांमध्ये आहे.

राहुल शेळके

GST Collection in September 2023: जीएसटी संकलनाच्या बाबतीत एक आनंदाची बातमी आली आहे. रविवारी वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सरकारला सप्टेंबर महिन्यात जीएसटीमधून 1,62,712 कोटी रुपये मिळाले, जे आधीच्या वर्षाच्या म्हणजेच सप्टेंबर 2022 च्या तुलनेत 10.2 टक्के जास्त आहे.

सप्टेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र टॉप-5 राज्यांमध्ये आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात जीएसटी संकलन 17 टक्क्यांनी वाढून 25,137 कोटी रुपये झाले आहे.

हा सलग सातवा महिना आहे जेव्हा मासिक जीएसटी संकलन 1.5 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. चालू आर्थिक वर्षातील हा चौथा महिना आहे ज्यात कर संकलनाने 1.6 लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पानुसार, केंद्राने GST संकलनात FY24 मध्ये 12 टक्के वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

जीएसटी संकलनाशी संबंधित आकडेवारी

सप्टेंबर महिन्याच्या जीएसटी संकलनापैकी केंद्रीय जीएसटी 29,818 कोटी रुपये आहे. याशिवाय, राज्य जीएसटी 37,657 कोटी रुपये आणि इंटीग्रेटेड जीएसटी 83,623 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या 41,145 कोटी रुपयांसह) आहे.

GST Collection in September 2023

2023-24 हे आर्थिक वर्ष जीएसटीच्या दृष्टीने खूप चांगले ठरत आहे. एप्रिलमध्ये सरकारी तिजोरीत 1.87 लाख कोटी रुपये आले तेव्हा या आर्थिक वर्षाची सुरुवात एका नव्या विक्रमाने झाली. हे कर संकलन गेल्या वर्षी एप्रिल 2022 च्या तुलनेत 12 टक्के अधिक आहे. तसेच, आत्तापर्यंत कोणत्याही एका महिन्यात जीएसटी संकलनाचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT