Honeywell
Honeywell sakal
Personal Finance

Honeywell : सामाजिक कार्यासाठी ‘हनिवेल’कडून ३.१ कोटी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील ग्रामीण भागात आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कंपनी ‘हनिवेल’ने चालू आर्थिक वर्षात ३.१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कंपनीची सामाजिक उपक्रम शाखा हनिवेल होमटाउन सोल्युशन्स इंडिया फाउंडेशनने अमेरिकेअर्स इंडिया फाउंडेशनशी भागीदारी केली आहे.

ग्रामीण भागातील आरोग्यसेवा आणि शैक्षणिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणांसाठी हनिवेल होमटाउन सोल्युशन्स इंडिया फाउंडेशनने २०२१-२२ मध्ये काम सुरू केले. एकट्या महाराष्ट्रात ८.७८ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीसह सुमारे ६६ प्राथमिक आरोग्य केंद्रे अद्ययावत करण्यात आली असून, ग्रामीण भागातील सुमारे २० लाख लोकांना त्याचा फायदा झाला आहे.

गेल्या वर्षभरात सांगली, सातारा आणि नाशिक जिल्ह्यातील २८ प्राथमिक आरोग्य केंद्रात सुधारणा करण्यात आली आहे, तर चार शाळांच्या सुधारणेसाठी आणि दर्जेदार शिक्षणासाठी आनंदगाव प्रकल्पाद्वारे १.२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ‘‘कोविड पश्चात ‘हनिवेल इंडिया’ने आरोग्यसेवा पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी अमेरिकेअर्स इंडिया फाउंडेशनसोबत भागीदारी केली. गेल्या वर्षी शैक्षणिक पायाभूत सुविधांना चालना देण्यावरही लक्ष केंद्रित केले.

गेल्या तीन वर्षांत वंचित समुदायांसाठी वैद्यकीय सुविधा वाढवण्याकरिता कंपनीने तीन राज्यांमध्ये १४.५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. महाराष्ट्रात जवळपास ३० प्रकल्प, उत्तराखंडमध्ये १२, हरियाणामध्ये १० आणि तामिळनाडूमध्ये २ प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत.’’ असे ‘हनिवेल इंडिया’चे अध्यक्ष आशिष मोदी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT