how IPL Teams owners franchise make money all you need to know
how IPL Teams owners franchise make money all you need to know Sakal
Personal Finance

IPL 2024: येरे येरे पैसा...! IPL मध्ये खेळाडूंवर पडतो पैशांचा पाऊस; पण खर्च करण्यासाठी पैसा येतो कुठून?

राहुल शेळके

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 17 वा हंगाम 22 मार्च 2024 पासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार असून ते एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहेत. आयपीएलमध्ये संघ पाण्यासारखा पैसा खर्च करतात. यामुळे बीसीसीआयची मोठी कमाई होते. अडीच महिने चालणाऱ्या या स्पर्धेत मोठा खर्च होतो.

मोठे उद्योगपती आणि प्रसिद्ध लोक इंडियन प्रीमियर लीगमध्ये संघ खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात. यामागचा मुख्य उद्देश या लोकांचे क्रिकेट वेड नसून नफा कमावणे हा आहे. आयपीएल संघ पूर्ण स्पर्धेत वेगवेगळ्या प्रकारे पैसे कमावतात. अशा परिस्थितीत आयपीएल संघांची कमाई कशी होते ते जाणून घेऊया. (IPL 2024, BCCI Source of Revenue)

आयपीएलमध्ये एक-दोन नव्हे तर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत. त्यात दोन गोष्टी असतात. पहिला मीडिया हक्क आणि दुसरा टायटल स्पॉन्सरशिपचे हक्क, ज्यातून BCCI आणि फ्रँचायझीची कमाई होते.

मीडिया आणि डिजिटल अधिकार

आयपीएल आणि बीसीसीआयचे खिसेही मीडिया आणि डिजिटल अधिकारांनी भरले आहेत. सॅटेलाइट टीव्ही चॅनेल्स प्रचंड किंमत देऊन मीडियाचे हक्क विकत घेतात. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अर्धा हिस्सा बीसीसीआय ठेवते आणि उरलेला निम्मा सर्व संघांमध्ये वाटला जातो.

2008 मध्ये म्हणजे पहिल्या हंगामातच, सोनीने पुढील 10 वर्षांसाठी स्पर्धेचे टीव्ही हक्क विकत घेतले होते. सोनीने टीव्ही हक्क 8,200 कोटी रुपयांना विकत घेतले.

यानंतर 2018 ते 2023 पर्यंतचे मीडिया अधिकार स्टार इंडियाकडे होते. यावेळी ते मुकेश अंबानींच्या जिओ सिनेमाजवळ आहे. मुकेश अंबानींनाही यातून चांगली कमाई अपेक्षित आहे.

DLF IPL, Vivo IPL, Tata IPL… या सर्व टायटल स्पॉन्सरशिप आहेत. म्हणजेच पैसे देऊन आयपीएलमध्ये स्पॉन्सरशिप कंपन्या आपले नाव देतात. सर्वात जास्त बोली लावणाऱ्या कंपनीला टायटल स्पॉन्सरशिप मिळते. म्हणजे क्रिकेटच्या माध्यमातून कंपनीच्या ब्रँडचा प्रचार होतो.

आयपीएलसाठी उत्पन्नाचा हा दुसरा सर्वात मोठा स्त्रोत आहे. सध्या टाटा आयपीएलचा टायटल स्पॉन्सर आहे. टाटा समूहाने दोन हंगामांसाठी 670 कोटी रुपयांना हक्क विकत घेतले आहेत.

व्यावसायिक जाहिरात

मॅचमध्ये एक ओव्हर संपल्यावर एक छोटा ब्रेक होतो आणि त्या छोट्या ब्रेकमध्ये टीव्हीवर जाहिराती दाखवल्या जातात. अहवालानुसार, सामन्याच्या मध्यभागी 10 सेकंदाच्या जाहिरात स्लॉटची किंमत सुमारे 15 लाख रुपये आहे.

चिप बनवणाऱ्या कंपन्यांपासून ते कोल्ड्रिंक्स आणि इतर अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींची विक्री या काळात जाहिरातींद्वारे वाढते. बीसीसीआयच्या एकूण कमाईपैकी 20 टक्के कमाई सामन्यादरम्यान चालणाऱ्या या जाहिरातीतून होते. याशिवाय टी-शर्ट, कॅप, हेल्मेट, स्टंप आणि अगदी अंपायरच्या ड्रेसवर असलेल्या लोगोमधूनही फ्रँचायझी चांगली कमाई करतात.

शेवटी स्थानिक महसूलातून कमाई होते, ज्यामध्ये स्थानिक स्पॉन्सर आणि बक्षीस रक्कम असते. दरवर्षी एका सामन्याच्या तिकीट विक्रीतून 5 कोटी रुपयांपर्यंतची कमाई होते. जर सामना एखाद्या संघाच्या घरच्या मैदानावर होत असेल तर फ्रँचायझीला त्या कमाईतील 80 टक्के रक्कम मिळते.

याशिवाय, संघ स्थानिक पातळीवर जितका अधिक लोकप्रिय असेल तितके स्थानिक पातळीवर त्याला अधिक स्पॉन्सर मिळतात, यासोबतच चॅम्पियनशिपच्या बक्षीस रकमेतूनही कमाई होते. त्यातील अर्धा भाग संघातील खेळाडूंकडे जातो आणि उरलेला अर्धा भाग कंपनीकडे असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT