Delivery Boy Sakal
Personal Finance

Delivery Boy: खायला पैसे नव्हते, फक्त चहावर जगत होता; LinkedIn मुळे असे पालटले डिलिव्हरी बॉयचे नशीब

सोशल मीडियाच्या मदतीने डिलिव्हरी बॉयचे नशीब पालटले आहे.

राहुल शेळके

Delivery Boy: आजच्या काळात सोशल मीडिया हे एक अतिशय शक्तिशाली माध्यम बनले आहे. सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर केवळ चर्चाच होत नाही, तर गरजूंना मदत करण्यासाठी ते एक शक्तिशाली माध्यम म्हणूनही काम करते.

असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यात सोशल मीडियाच्या मदतीने एका गरजू व्यक्तीला नोकरी मिळाली, जो आर्थिक परिस्थितीमुळे स्विगीसोबत डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करत होता.

टेक कंपनी फ्लॅशच्या मार्केटिंग मॅनेजर प्रियांशी चंदेल यांनी लिंक्डइनवर ही गोष्ट शेअर केली आहे. ही गोष्ट स्विगीच्या एका डिलिव्हरी बॉयची आहे. जेव्हा तो जेवणाची डिलिव्हरी करण्यासाठी गेला होता. तेव्हा तो उशीरा आणि अत्यंत थकलेला होता.

प्रियांशीने त्याला उशीर होण्याचे कारण विचारले तेव्हा साहिल सिंग नावाच्या डिलिव्हरी बॉयने सांगितले की, त्याच्याकडे डिलिव्हरी करण्यासाठी दुचाकी नाही. यासाठी त्याने तीन किमी अंतरावरून पायीच डिलिव्हरी केली होती.

लिंक्डइनवर प्रियांशी चंदेल यांची पोस्ट

नोकरी शोधण्यासाठी मागितली मदत:

साहिलनो प्रियांशीला सांगिलते की तो इलेक्ट्रिकल आणि कम्युनिकेशन इंजिनिअर आहे. यापूर्वी त्याने Byju's आणि Ninjacraft सारख्या कंपन्यांमध्येही काम केले आहे.

कोरोना काळात त्याला जम्मूला त्यांच्या घरी परत जावे लागले. सध्या त्याच्याकडे कोणतीही नोकरी नाही आणि त्यामुळे त्याच्याकडे ना घराच्या भाड्यासाठी पैसे आहेत ना खाण्यापिण्यासाठी काही. साहिलने प्रियांशीला पैशाची गरज नसून नोकरी शोधण्यासाठी मदत हवी असल्याचे सांगितले होते.

साहिलची मार्कशीट

जेवणासाठी पैसे नव्हते:

प्रियांशीच्या म्हणण्यानुसार, साहिलने सांगितले की, मी आठवडाभर काही खाल्ले नाही. फक्त चहा-पाण्यावर जगतो. मी तुझ्याकडून काही मागत नाही.

तुम्ही मला नोकरीला लावा, मी पूर्वी 25 हजार कमवत होतो. माझे वय 30 वर्षे आहे. माझे आई-वडील वृद्ध होत आहेत आणि अशा परिस्थितीत मी त्यांच्याकडे पैसे मागू शकत नाही.

या पोस्टसोबतच प्रियांशीने साहिलची मार्कशीट आणि त्याचे संपर्क तपशीलही शेअर केले जेणेकरून लोक त्याला मदत करू शकतील.

पोस्टसोबतच जोडलेल्या मार्कशीटनुसार, साहिलने शालेय शिक्षण जम्मू आणि काश्मीर राज्य मंडळातून केले आणि मेवाड विद्यापीठातून बी.टेक. पूर्ण केले.

अखेर साहिलला नोकरी लागली:

यानंतर ती पोस्ट लिंक्डइनवर व्हायरल झाली. कोणी साहिलला राहण्यासाठी जागा देऊ लागले तर काहींनी साहिलला नोकरीची ऑफरही दिली. नंतर प्रियांशीने सांगितले की साहिलला नोकरी लागली आहे. साहिलला कुठे आणि कोणत्या प्रकारची नोकरी मिळाली हे त्याने सांगितले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT