JP Morgan CEO praised PM Modi said Modi has done incredible work in India Sakal
Personal Finance

JP Morgan CEO: 'अमेरिकेला मोदींसारख्या नेत्याची गरज', जेपी मॉर्गनचे सीईओ यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक

JP Morgan CEO praised PM Modi: जेपी मॉर्गन चेसचे अध्यक्ष आणि सीईओ जेमी डिमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आणि त्यांनी भारतात चांगले काम केले असल्याचे सांगितले. जेमी डिमन म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी 40 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे आणि ते भारतात "अविश्वसनीय काम" करत आहेत.

राहुल शेळके

JP Morgan CEO praised PM Modi: जेपी मॉर्गन चेसचे अध्यक्ष आणि सीईओ जेमी डिमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आणि त्यांनी भारतात चांगले काम केले असल्याचे सांगितले. इकॉनॉमिक क्लब ऑफ न्यूयॉर्कने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना डिमन यांनी पंतप्रधान मोदींच्या गरिबी निर्मूलन, पायाभूत सुविधांचा विकास आणि नोकरशाही सुधारणा यांसाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

मोदींनी 40 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले

जेमी डिमन म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी 40 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे आणि ते भारतात "अविश्वसनीय काम" करत आहेत. डिमन यांनी मोदी सरकारने लागू केलेल्या आर्थिक सुधारणांचे कौतुक केले आणि ते म्हणाले की त्यापैकी काही सुधारणा अमेरिकेतही केल्या जाऊ शकतात. अमेरिकेलाही मोदींसारख्या कणखर नेत्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

जेपी मॉर्गनचे सीईओ आणखी काय म्हणाले?

डिमन पुढे म्हणाले की, मोदी सरकारने सुमारे 70 कोटी लोकांची बँक खाती उघडली आणि लोकसंख्येच्या एका महत्त्वपूर्ण भागाला अर्थव्यवस्थेशी जोडले. ते म्हणाले की, भारताच्या शिक्षण व्यवस्थेत आणि पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत आणि हे केवळ एका व्यक्तीमुळेच शक्य झाले आहे.

नोकरशाहीने तयार केलेले जाळे फोडण्यासाठी कठोर व्हावे लागते आणि मोदी तेच करत आहेत. डिमन यांनी भारताला हवामान बदल आणि कामगार हक्क या विषयावर व्याख्यान देणाऱ्या परदेशी सरकारांचाही समाचार घेतला.

भारताच्या उदारमतवादी पत्रकारांनाही आरसा दाखवला

डिमॉन यांनी भारताच्या उदारमतवादी पत्रकारांनाही देखील आरसा दाखवला आहे कारण मोदींनी त्यांची महत्त्वपूर्ण कामगिरी असूनही त्यांच्यावर अनेकदा टीका केली.

ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या धोरणांमुळे जवळपास 40 कोटी भारतीयांना गरिबीतून बाहेर काढले आहे आणि ही एक मोठी उपलब्धी आहे, जी मान्य करायला हवी. डिमन यांनी आर्थिकबाबतीत भारताने केलेल्या प्रगतीचेही कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT