Ashneer Grover: ''करदाते हे अल्पसंख्याक आहेत, देशात फक्त 0.5 टक्के मतदार आयकर भरतात'', अश्नीर ग्रोव्हर यांचे वक्तव्य चर्चेत

Ashneer Grover: देशातील फक्त 0.5 टक्के मतदार आयकर भरतात आणि निवडणुकीच्या वेळी करदाते हे अल्पसंख्याक असतात. थर्ड युनिकॉर्नचे संस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांनी देशात सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत हे वक्तव्य केले आहे.
Tax Payers Are Meaningless Minorities Only 0.5 percent Of Voters Pay Income Tax, Says Ashneer Grover
Tax Payers Are Meaningless Minorities Only 0.5 percent Of Voters Pay Income Tax, Says Ashneer Grover Sakal

Ashneer Grover: देशातील फक्त 0.5 टक्के मतदार आयकर भरतात आणि निवडणुकीच्या वेळी करदाते हे अल्पसंख्याक असतात. थर्ड युनिकॉर्नचे संस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांनी देशात सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत हे वक्तव्य केले आहे.

राजकीय सभांमध्ये होणाऱ्या भाषणांवर ग्रोव्हर यांची ही प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, ''तुम्हाला भारतातील 'टॅक्स पॉलिटिक्स' समजून घेणे आवश्यक आहे. 8/140 कोटी आयटी रिटर्न भरतात. फक्त 2/140 कोटी भारतीय आयकर भरतात. त्यापैकी 45 लाख या आयकरात 80% योगदान देतात. एकूण मतदार 97 कोटी आहेत. गणना केल्यास, 0.5% मतदार आयकर भरतात. त्यामुळे राजकीय सभांमध्ये तुम्ही करांवर काहीही बोलू शकता. जोपर्यंत निवडणुकांचा संबंध आहे, करदाते हे अल्पसंख्याक आहेत.''

Ashneer Grover
Ashneer GroverSakal

अश्नीर ग्रोव्हर यांनी यापूर्वीही आयकरावर भाष्य केले

अशनीर ग्रोवर यांनी आयकराबाबत भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. जून 2023 मध्ये ते म्हणाले होते की, भारतात असमान कर प्रणाली आहे आणि सरकार आमच्या उत्पन्नाच्या 30-40 टक्के कर घेते. देशात करदाते हे दानधर्म करत आहेत. त्यांना कोणताही लाभ मिळत नाही.''

Tax Payers Are Meaningless Minorities Only 0.5 percent Of Voters Pay Income Tax, Says Ashneer Grover
Kotak Mahindra Bank: कोटक महिंद्रा बँकेला मोठा झटका; आरबीआयने नवीन क्रेडिट कार्ड देण्यावर घातली बंदी, काय आहे कारण?

ग्रोव्हर म्हणाले होते, “तुम्ही मला एक गोष्ट सांगा, जेव्हा तुम्हाला माहित असेल की मी 10 रुपये कमावणार आहे आणि सरकार 4 रुपये ठेवणार आहे, तेव्हा तुम्ही 12 पैकी 5 महिने सरकारसाठी काम करत आहात. तुमच्याकडे किती वर्षे आहेत? आपल्याला सरकारचे गुलाम व्हावे लागेल... आणि आपण सर्वांनी गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारल्या आहेत, होय, हे असेच आहे."

Tax Payers Are Meaningless Minorities Only 0.5 percent Of Voters Pay Income Tax, Says Ashneer Grover
Reliance Jio: 5G शर्यतीत जिओ बादशहा! जिओ बनले जगातील सर्वात मोठे मोबाइल ऑपरेटर, चायनाला टाकले मागे

ग्रोव्हर पुढे म्हणाले की, उद्योजकांना हे समजत असल्याने ते कर भरत नाहीत, परंतु पगारदार कर्मचाऱ्यांचा टीडीएस कापला जात असल्याने त्यांना पर्याय नाही. त्यामुळे कर ही शिक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com