Large and Mid Cap Funds economy growth story finance money
Large and Mid Cap Funds economy growth story finance money  Sakal
Personal Finance

लार्ज अँड मिड कॅप फंड : देशाच्या वृद्धीगाथेत हिस्सेदारी

सकाळ वृत्तसेवा

भांडवली बाजारात योग्य गुंतवणुकीद्वारे भारताच्या वृद्धीगाथेत सहभागातून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग

- नरेश करपे

येत्या दोन-तीन वर्षांत भारताचा विकास वेगाने होईल अशी अपेक्षा आहे. उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन योजना (पीएलआय), नादारी आणि दिवाळखोरी संहिता (आयबीसी), सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे महाविलिनीकरण, जीएसटी, जमीन सुधारणा आणि ‘मेक इन इंडिया’ मोहिमेसारख्या सहाय्यकारी सरकारी धोरणांमुळे खासगी क्षेत्रातून भांडवली विस्ताराच्या योजनेला नवोन्मेषास चालना दिली आहे.

या सर्व धोरणांच्या परिणामी प्रभावाने भारताच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळाली आहे. कोरोना महासाथीच्या तडाख्यानंतर झपाट्याने दिसून आलेली आर्थिक उभारी याचे स्पष्ट द्योतक आहे. पुढे, कर्ज आणि सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात ‘जीडीपी’ गुणोत्तर कमी होत जाऊन भारताला चांगली आर्थिक स्थिरता प्राप्त होण्यास मदत होऊ शकते. भांडवली बाजारात योग्य गुंतवणुकीद्वारे भारताच्या वृद्धीगाथेत सहभागातून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

तथापि, नजीकच्या काळात, भू-राजकीय तणावादरम्यान जागतिक मध्यवर्ती बँकांच्या व्याजदरवाढीच्या चक्रामुळे परिणामी संभवणारी अनिश्चितता लक्षात घेता बाजार अस्थिर राहण्याची शक्यता आहे. अशा वेळी, जोखीम घेण्याची क्षमता आणि उद्दिष्टे विचारात घेऊन वैविध्यपूर्ण म्युच्युअल फंडांच्या संचासह आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओची रचना करणे नेहमीच उचित ठरते.

इक्विटी अर्थात शेअर संलग्न गुंतवणुकीचा प्रश्न येतो तेव्हा, संपत्ती निर्मिती आणि दीर्घोद्देशी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लार्ज आणि मिड कॅपमधील नामांकित कंपन्यांच्या मिश्रणात गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. लार्ज कॅप हे प्रस्थापित व्यवसाय आणि त्या त्या क्षेत्रातील अग्रणी कंपन्या आहेत, तर मिड कॅप कंपन्यांमध्ये उद्याच्या लार्ज कॅप बनण्यासाठी मोठी झेप घेण्याची क्षमता आहे.

अशाप्रकारे, व्यवसायाच्या दोन्ही संचाच्या प्रदर्शनामुळे गुंतवणूकदारांना स्थिरता आणि वाढीचे घटक मिळू शकतात. तथापि, सामान्य गुंतवणूकदारासाठी, बाजाराचा माग घेत राहणे आणि आवश्यक त्या समयी गुंतवणुकीचा निर्णय घेणे सोपे नाही. येथेच लार्ज आणि मिड कॅप इक्विटी योजना आपल्यासाठी उपकारक ठरतात.

बाजार नियामक ‘सेबी’द्वारे ऑक्टोबर २०१७ मध्ये सादर केल्या गेलेल्या अशा धाटणीच्या योजनांतून तुम्हाला दोन्ही प्रकारच्या कंपन्यांत एकाच ठिकाणी गुंतवणुकीची संधी मिळते आणि ही तुमची गुंतवणूक योजनेद्वारे व्यावसायिकरित्या व्यवस्थापित केली जाते.

ज्या गुंतवणूकदारांना स्थिरता आणि वाढ हवी आहे, त्यांनी लार्ज आणि मिड कॅप योजनांचा अवश्य विचार करावा. या श्रेणीमध्ये अनेक फंड उपलब्ध असले तरी, आयसीआयसीआय प्रुडेंशियल लार्ज आणि मिड कॅप फंड हा त्यातील एक सातत्यपूर्ण कामगिरी करणारा फंड आहे. देशाच्या वृद्धीगाथेचे फायदे मिळवण्यासाठी आणि तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी ही योजना उत्तम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT