LPG Cylinder Prices Came Down In 4 Metro Cities Check Latest Rates In Your City Sakal
Personal Finance

LPG Cylinder: मोठी बातमी! चार शहरांमध्ये LPG सिलिंडरच्या किंमती झाल्या कमी; काय आहेत नवीन दर?

LPG Cylinder Price: तेल कंपन्यांनी चार मेट्रो शहरांमध्ये व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे.

राहुल शेळके

LPG Cylinder Price: तेल कंपन्यांनी चार मेट्रो शहरांमध्ये 19-किलोग्राम व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. 16 नोव्हेंबरपासून लागू झालेल्या सिलिंडरच्या किंमती 57.5 रुपयांनी कमी झाल्या आहेत.

या चार शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईचा समावेश आहे. सुधारित किंमतींनुसार, 19-kg व्यावसायिक LPG सिलेंडरची किंमत नवी दिल्लीत 1,775.5 रुपये, कोलकात्यात 1,885.5 रुपये, मुंबईत 1,728 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,942 रुपये असेल.

व्यावसायिक एलपीजीच्या किंमती कमी झाल्या असल्या तरी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती मात्र कायम आहेत. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतील कपातीमुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स यांसारख्या व्यवसायांवरील भार कमी होण्याची अपेक्षा आहे.

1 नोव्हेंबरला व्यावसायिक सिलिंडर महाग झाला होता

याआधी 1 नोव्हेंबर रोजी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती 103 रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या. 1 नोव्हेंबरलाही 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

30 ऑगस्टपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर आहेत. त्यानंतर 200 रुपयांनी घट झाली. उज्ज्वला योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लोकांसाठी सबसिडी 200 रुपयांवरून 400 रुपये करण्यात आली आहे.

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतींबद्दल बोलायचे झाले तर, दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, चेन्नईमध्ये 918.50 रुपये आणि मुंबईत 902.50 रुपयांना विकले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT