Maharashtra Budget 2024 Sakal
Personal Finance

Maharashtra Budget 2024: ग्रामसडक योजना ते सागरी बंदर; पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा

Maharashtra Interim Budget 2024: महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. हे निवडणुकीचे वर्ष असल्याने अर्थसंकल्प अंतरिम होता. या अर्थसंकल्पात सरकारच्या पुढील 4 महिन्यांच्या खर्चासाठी तरतूद केली आहे.

राहुल शेळके

Maharashtra Assembly Interim Budget Session 2024: महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. हे निवडणुकीचे वर्ष असल्याने अर्थसंकल्प अंतरिम होता. या अर्थसंकल्पात सरकारच्या पुढील 4 महिन्यांच्या खर्चासाठी तरतूद केली आहे.

पायाभूत सुविधांकरिता मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक करण्यात आली आहे. तसेच नागरिकांचे जीवनमान उंचावण्याकरिता विविध विकास योजनांवर भर देण्यात आला आहे. राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून विधानसभेत सादर करण्यात आला.

  • अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी खालील तरतुदी करण्यात आल्या आहेत.

  • विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गाकरीता भूसंपादनासाठी 22 हजार 225 कोटी

  • पुणे चक्राकार वळण मार्गाकरीता भूसंपादनासाठी 10 हजार 519 कोटी

  • जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी 2 हजार 886 कोटी रुपये

  • सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता नगरविकास विभागाला 10 हजार 629 कोटी रुपये

  • सार्वजनिक बांधकाम (रस्ते) विभागाला 19 हजार 936 कोटी रुपये

  • महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ॲन्युईटी योजना भाग-2 अंतर्गत 7 हजार 500 किलोमीटर रस्त्यांची कामे

  • मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा 2 मधील 7 हजार 600 कोटी रुपये खर्चून 7 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा विकास

  • कल्याण-मुरबाड, पुणे-नाशिक आणि सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचे भूसंपादन सुरु

  • फलटण-पंढरपूर, कांपा-चिमूर-वरोरा, जालना-जळगाव आणि नांदेड-बिदर या नवीन रेल्वे मार्गांकरिता 50 टक्के आर्थिक सहभाग

  • जालना-खामगाव, आदिलाबाद-माहूर-वाशिम, नांदेड-हिंगोली, मूर्तिजापूर-यवतमाळ शकुंतला रेल्वे आणि पुणे-लोणावळा मार्गिका 3 व 4 या रेल्वे मार्गांकरिता 50 टक्के आर्थिक सहभाग

  • वाढवण बंदर विकास प्रकल्पात महाराष्ट्र सागरी मंडळाचा 26 टक्के सहभाग- एकूण किंमत 76 हजार 220 कोटी रुपये

  • सागरमाला योजनेअंतर्गत मुंबईत गेट वे ऑफ इंडियालगत रेडिओ क्लब सुसज्ज जेट्टीचे, 229 कोटी 27 लाख रुपये किंमतीचे बांधकाम

  • भगवती बंदर, रत्नागिरी-300 कोटी रुपये, सागरी दुर्ग जंजिरा, रायगड-111 कोटी रुपये, एलिफंटा, मुंबई-88 कोटी रुपये बंदर विकासाची कामे

  • मिरकरवाडा, रत्नागिरी बंदराचे आधुनिकीकरण-2 हजार 700 मच्छीमारांना फायदा

  • छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या विस्ताराकरिता भूसंपादनासाठी 578 कोटी 45 लाख रुपयांचा निधी

  • सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता ग्रामविकास विभागाला 9 हजार 280 कोटी रुपये

  • गृह-परिवहन, बंदरे विभागाला 4 हजार 94 कोटी रुपये

  • उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी सुधारित औद्योगिक, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण उत्पादनाचे सुधारित धोरण तसेच नवीन सुक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम धोरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT