Maharashtra Interim Budget 2024 Sakal
Personal Finance

Maharashtra Budget 2024: अर्थमंत्री अजित पवार उद्या मांडणार अंतरिम अर्थसंकल्प; शेतकरी, ओबीसी आणि महिलांना काय मिळणार?

Maharashtra Interim Budget 2024: महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 27 जून ते 12 जुलै दरम्यान होणार आहे. मुंबईत 27 जून ते 12 जुलै या कालावधीत सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान सत्ताधारी महायुती सरकार 28 जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे.

राहुल शेळके

Maharashtra Interim Budget 2024: महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 27 जून ते 12 जुलै दरम्यान होणार आहे. मुंबईत 27 जून ते 12 जुलै या कालावधीत सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान सत्ताधारी महायुती सरकार 28 जून रोजी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे.

फेब्रुवारीमध्ये जेव्हा महायुती सरकारने राज्याचा पहिला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला तेव्हा राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला नव्हता. हा अहवाल आज सादर करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 7.6 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवला आहे.

राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होत आहे त्यामुळे सरकारला दुसर्‍यांदा अंतरिम अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आजपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महायुती सरकार शेतकरी, महिला आणि समाजातील उपेक्षित घटकांच्या हिताला प्राधान्य देईल.

ओबीसी आणि शेतकऱ्यांबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता

मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला 13 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दुसरीकडे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे ओबीसी कोट्यात मराठ्यांचा समावेश करण्यास विरोध करत आहेत. विरोधकही महाराष्ट्रात जात जनगणनेची मागणी करत आहेत.

या सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी अर्थसंकल्पात ओबीसींसाठी मोठी घोषणा अपेक्षित आहे. याशिवाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली जाऊ शकते. दुष्काळापासून दिलासा देण्यासाठी सरकार पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ करू शकते.

याशिवाय अल्पसंख्याकांना दिलासा देण्याचीही तयारी सुरू आहे. याशिवाय महिला आणि युवकांसाठी भत्ता देण्यासारख्या नवीन योजना जाहीर केल्या जाऊ शकतात.

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत, त्यांनाही भरपाईची रक्कम वाढवण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनात मंत्रिमंडळ विस्तारही शक्य आहे. सध्या 14 नवीन मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2026

Satara Accident: कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार; टोपजवळील अपघातात पती गंभीर जखमी, कऱ्हाड तालुक्यातून हळहळ व्यक्त!

Income Tax : ‘रिफंड’ मिळण्यास विलंब कशामुळे?

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

SCROLL FOR NEXT