Max Life Insurance company announced Highest bonus ever 1826 crore Sakal
Personal Finance

Max Life Insurance : ‘मॅक्स लाइफ’ कंपनीतर्फे सर्वोच्च बोनस जाहीर

कंपनीचा हा सलग २२ वा वार्षिक बोनस आहे. हा वार्षिक बोनस अंदाजे २१ लाख पात्र सहभागी पॉलिसीधारकांना मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनीने पात्र पॉलिसीधारकांसाठी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक १,८२६ कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात घोषित केलेल्या बोनसपेक्षा त्यात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कंपनीचा हा सलग २२ वा वार्षिक बोनस आहे. हा वार्षिक बोनस अंदाजे २१ लाख पात्र सहभागी पॉलिसीधारकांना मिळणार आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता ६७,७२२ कोटींवर पोहोचली असून, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये वैयक्तिक समायोजित प्रथम वर्ष प्रीमियम १६ टक्क्यांनी वाढून ६९६१ कोटीं रुपये झाले आहे, तर एकूण लेखी प्रीमियम २९,५२९ कोटी रुपये आहे.

‘‘स्पर्धात्मक फंड व्यवस्थापनामुळे हा सर्वोच्च बोनस देणे शक्य झाले असून, गेल्या वर्षभरात, उत्पादनात नावीन्य आणण्यात व स्मार्ट वेल्थ ॲडव्हांटेज ग्रोथ योजनेसारखे प्रस्ताव तयार करण्यात आघाडी घेतली आहे,’’ असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत त्रिपाठी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

Gas Cylinder Shortage Impacts Small Businesses : धक्कादायक! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच घेतला गळफास

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार अपघातप्रकरणी नवी अपडेट समोर, सहवैमानिकाचे ‘ओह शीट’ उद्‍गार; कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar:‘आदर्श’मध्ये अजूनही ३३८ कोटी अडकलेले ; साडेतीन वर्षांत दहा टक्केही कर्ज वसुली नाही

Chhatrapati Sambhajinagar: दोन कोटी लिटर पाणी आले पाइपलाइनमध्ये दुसऱ्या दिवशीही चाचणी : संत एकनाथ साखर कारखान्यापर्यंत पोचले पाणी

SCROLL FOR NEXT