PM Narendra Modi News
PM Narendra Modi News esakal
Personal Finance

Textile Plant: मोदी सरकार 'या' राज्यांमध्ये 7 मेगा टेक्सटाईल प्लांट उभारणार; 20 लाख लोकांना मिळणार रोजगार

राहुल शेळके

Textile Plant: मेक इन इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने देशात सात मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्याची योजना जाहीर केली आहे. पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन्स अँड अपेरल (PM MITRA) योजनेंतर्गत घोषित करण्यात आलेले हे सात प्लांट तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये उभारले जातील.

PM मित्र योजना ऑक्टोबर 2021 मध्ये एकूण 4,445 कोटी खर्चासह सुरू करण्यात आली होती आणि 2023-24 च्या अर्थसंकल्पात प्रकल्पासाठी प्रारंभिक वाटप 200 कोटी रुपये करण्याची घोषणा केली आहे. (Modi Government To Generate 20 Lakh Jobs Via 7 Mega Textile Plants In These States)

17 मार्च रोजी ट्विटरवरून, पीएम मोदींनी स्पष्ट केले होते की “पीएम मित्र मेगा टेक्सटाईल पार्क वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतील, करोडोची गुंतवणूक होईल आणि लाखो नोकऱ्या निर्माण होतील. हे 'मेक इन इंडिया' आणि 'मेक फॉर द वर्ल्ड'चे उत्तम उदाहरण असेल.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, सरकारने सुमारे 20 लाख नोकऱ्या निर्माण करण्याच्या उद्दिष्टासह जवळपास ₹70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार केला आहे.

देशात वस्त्रोद्योग असंघटित झाला आहे. या वाढलेल्या अपव्यय आणि लॉजिस्टिक खर्चामुळे देशाच्या वस्त्रोद्योग क्षेत्राच्या स्पर्धात्मकतेवर परिणाम झाला आहे.

सात ठिकाणांची निवड करण्याच्या पात्रतेबद्दल बोलताना वस्त्रोद्योग सचिव रचना शाह म्हणाल्या की, त्यांच्या मंत्रालयाने 13 राज्यांतील 18 प्रस्तावांचा विचार करून पारदर्शक पद्धतीने जागा निवडल्या आहेत.

सात टेक्सटाईल पार्कसाठी निवडण्यात येणाऱ्या जागेची पात्रता पारदर्शक पद्धतीने निश्चित करण्यात आली आहे. यासाठी अनेक घटकांचा विचार केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT