mukesh ambani birthday he never consumes alcohol and non veg know healthy lifestyle secret  Sakal
Personal Finance

Mukesh Ambani Birthday: भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस दारूच्या थेंबालाही स्पर्श करत नाही

Mukush Ambani Health & Lifestyle : भारतात श्रीमंतांच्या यादीत कायम अग्रस्थानी असणारे मुकेश अंबांनी. आज मुकेश अंबानी यांचा वाढदिवस. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस जेवणात कोणते पदार्थ खात असणार असा प्रश्नही बऱ्याच लोकांना पडला असेलच.

सकाळ वृत्तसेवा

Mukush Ambani Health & Lifestyle : भारतात श्रीमंतांच्या यादीत कायम अग्रस्थानी असणारे मुकेश अंबांनी. आज मुकेश अंबानी यांचा वाढदिवस. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस जेवणात कोणते पदार्थ खात असणार असा प्रश्नही बऱ्याच लोकांना पडला असेलच. मुकेश अंबानी यांची राहाणी आणि त्याचं जेवण अगदी साधं आणि सात्विक आहे.

आज मुकेश अंबांनी यांनी वयाची सहाशष्टी पार केली. मात्र त्यांच्याकडे बघता ते वयाच्या साठीनंतरही तेवढेच फिट असल्याचे तुम्हाला दिसून येईल. बरेच बिजनेसमॅन नेटवर्किंग वाढावं म्हणून पार्टीजना जातात. या पार्टीजमधे बहुतांश लोक मद्यपान करतात. बिजनेस रिलेशन्स वाढवण्यासाठी आम्हाला मद्यपान करावं लागतं असं अनेक बिजनेसमॅन म्हणतात. मात्र भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस मद्यपान करत नाही हे ऐकून कदाचिच तुम्हालाही आश्चर्य वाटेल. (Health)

Mukush Ambani Health

मुकेश अंबानींना आवडतं साधं जेवण

त्यांच्या जेवणाबाबात बोलायचे झाल्यास त्यांना अगदी साधं जेवण आवडतं. त्यांच्या जेवणातील आवडत्या पदार्थांच्या यादीत भात, दाळ, भाजी आणि चपाती आहे. ब्रेकफास्टमधे त्यांना पपईचा ज्यूस प्यायला आवडतं. त्यांच्या दुपारच्या जेवणात सॅलेट, चपाती आणि भाजी यांचा समावेश असतो.

Mukush Ambani Health

एका रिपोर्टनुसार त्यांच्या रात्रीच्या जेवणात ते भात शाक घेतात. तसेच त्यांना स्वाती स्नॅक्स फार आवडतात. सोशल मीडियावर देखील त्यांच्या या आवडत्या पदार्थाबाबत फार चर्चा असते. त्यांना रविवारच्या नाश्त्यात इडली सांभर खायला आवडतं.

स्वाती स्नॅन्क शिवाय त्यांना मुंबईतील माटुंगा भागातील मैसूर कॅफेमधील पदार्थही फार आवडतात. ते बरेचदा तिथून खाद्यपदार्थ ऑर्डर करतात. एका मुलाखतीत नीता अंबानी यांनी सांगितले होते की, जेव्हाही मुकेश घरी उशीरा येतात तेव्हा ते नीतासोबत डिनर एन्जॉय करतात.

Mukush Ambani Health

मुकेश अंबानींकडे पैशांची अजिबात कमतरता नाही. मात्र असे असूनही त्यांना महागड्या हॉटेल्स किंवा बारची गोडी नाही. त्यांना साधे जेवण जेवायला आवडते. मुकेश अंबानी महागड्या हॉटेल्समधेच जेवतात असे नाही. स्ट्रीट फूडसुद्धा ते तेवढ्याच आनंदाने खातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

Latest Maharashtra News Updates : राज्य मुक्त विद्यालयात नावनोंदणीची प्रक्रिया गुरुवारपासून होणार सुरू

SCROLL FOR NEXT