Personal Finance

Mutual Fund: फक्त 20 रुपये गुंतवणूक करून बनू शकता करोडपती? इथे आहे सिक्रेट

म्युच्युअल फंडमध्ये चांगला परतावा मिळत असतानाही लोक त्यात गुंतवणूक करण्यास का कचरतात?

राहुल शेळके

Mutual Fund: भारतातील बहुतेक लोक गुंतवणूकीचा पहिला पर्याय म्हणून मुदत ठेव (FD) निवडतात. परंतु या महागाईत मुदत ठेवींमधून फारशा परताव्याची अपेक्षा करता येत नाही.

अशा परिस्थितीत, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे हा उत्तम परताव्यासाठी योग्य मार्ग असू शकतो. गेल्या दोन दशकात म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे.

प्रश्न असा पडतो की म्युच्युअल फंडमध्ये चांगला परतावा मिळत असतानाही लोक त्यात गुंतवणूक करण्यास का कचरतात? याचे साधे उत्तर म्हणजे माहितीचा अभाव. लोकांना म्युच्युअल फंडाची योग्य माहिती नसते, काही लोकांकडे माहिती असते तरीही ती अर्धी अपूर्ण असते.

काहीजण म्युच्युअल फंडात पैसेही गुंतवत आहेत. परंतु त्यापैकी बहुतेकजण फंड निवडीत चुका करतात आणि नंतर पोर्टफोलिओ नकारात्मक दिसला की निराश होतात. अशा परिस्थितीत बहुतेक गुंतवणूकदार एसआयपी बंद करतात.

आजच्या कळात, बहुतेक लोक सोशल मीडियावर सुचवलेल्या पोर्टफोलिओवर पैसे लावतात. त्यामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागते.

आता प्रश्न पडतो की म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी? म्हणून यासाठी प्रथम तुमची जोखीम पहा आणि नंतर एक रक्कम ठरवा ज्याद्वारे तुम्ही दर महिन्याला नियमितपणे SIP मध्ये गुंतवणूक करु शकता.

फंड निवडीत तुम्ही म्युच्युअल फंड सल्लागाराची मदत घेऊ शकता. जर म्युच्युअल फंड सल्लागाराच्या मदतीने घेतले तर ते वेळोवेळी त्याचा आढावा घेत राहतात, जेणेकरून तुमचे आर्थिक लक्ष्य साध्य करण्यासाठी मदत होते.

जर तुम्ही फंडाची निवड योग्य प्रकारे केली, तर काही महिन्यांतच तुमच्या पोर्टफोलिओचा रंग हिरवा दिसू लागेल. पोर्टफोलिओमध्ये नफा दिसताच, गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी उत्साह येतो, मग ते हळूहळू गुंतवणूक वाढवत राहतात आणि आर्थिक उद्दिष्ट सहज साध्य करतात.

10-20 रुपये वाचवूनही तुम्ही श्रीमंत होऊ शकता

एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवूनच गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य होते असे नाही, जर तुमच्याकडे वेळ असेल तर दर महिन्याला छोटी रक्कम गुंतवूनही तुम्ही श्रीमंत होऊ शकता.

अनेकदा लोक या प्रकाराकडे दुर्लक्ष करतात, त्यांचे एकच उत्तर असते, प्रत्यक्षात तसे होत नाही. पण हे शक्य आहे. यासाठी तुम्हाला फक्त तुमचे ध्येय गाठण्यासाठी गुंतवणुकीबाबत तुम्हाला योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.

तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे दर महिन्याला म्युच्युअल फंडात किमान 500 रुपये गुंतवू शकता. दररोज 10-20 रुपये वाचवूनही तुम्ही मोठे ध्येय साध्य करू शकता.

तुम्ही दररोज 20 रुपये जोडून 10 कोटी रुपये उभे करू शकता. हे अगदी शक्य आहे, तुम्हाला फक्त गुंतवणुकीच्या दिशेने पावले उचलण्याची गरज आहे.

नियमित गुंतवणुकीनेच ध्येय साध्य करणे शक्य

उदाहरणार्थ 20 वर्षांच्या तरुणाने दररोज 30 रुपये वाचवले, जे एका महिन्यात 900 रुपये होतात. जर त्याने ही रक्कम एसआयपीद्वारे कोणत्याही वैविध्यपूर्ण म्युच्युअल फंडात गुंतवली, तर 40 वर्षांनंतर, त्याला या गुंतवणुकीवर 12% परताव्याच्या दराने 1.07 कोटी रुपये मिळतील. या दरम्यान 4,32,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

जर तुम्हाला म्युच्युअल फंडाविषयी काहीही माहिती नसेल तर सुरुवातीला वित्तीय सल्लागाराच्या मदतीने SIP करा. कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतही जोखीम असते.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

मेल-एक्सप्रेस आणि लोकलच्या संख्येत वाढ, प्लॅटफॉर्मचा विस्तार, नवीन 238 ऑटोमॅटिक डोअर गाड्या... प्रवाशांसाठी मोठी घोषणा

Shakambhari Navrtri 2025: शाकांभरी नवरात्र का आहे खास? जाणून घ्या तारीख, पूजा विधी अन् महत्त्व एकाच क्लिकव

Sleep Science Explained: रात्री 8 तासांची पूर्ण झोप की दुपारची डुलकी? काय आहे फायदेशीर, वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT