कौशल्य विकास महामंडळाचा ‘बजाज फिनसर्व्ह’शी करार sakal
Personal Finance

कौशल्य विकास महामंडळाचा ‘बजाज फिनसर्व्ह’शी करार

‘बजाज फिनसर्व्ह’ने १०० तासांचा बॅंकिंग, वित्तीय क्षेत्र आणि विमा विषयातील एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार केला

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आर्थिकसेवा क्षेत्रातील रोजगारसंधींचा लाभ घेण्यासाठी पदवीधर तरुणांना आवश्यक कौशल्ये आत्मसात करता यावीत, या उद्देशाने राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) तसेच ‘एआयसीटीई’ यांनी बजाज फिनसर्व्ह कंपनीशी दोन सामंजस्य करार केले आहेत.

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धमेंद्र प्रधान, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सचिव अतुल कुमार तिवारी, ‘एआयसीटीई’चे सदस्य सचिव राजीव कुमार आणि ‘एनएसडीसी’चे सीईओ वेद मणी तिवारी, ‘बजाज फिनसर्व्ह’चे अध्यक्ष संजीव बजाज यांच्या उपस्थितीत या करारांवर सह्या करण्यात आल्या.

‘बजाज फिनसर्व्ह’ने १०० तासांचा बॅंकिंग, वित्तीय क्षेत्र आणि विमा विषयातील एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून २० हजार उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल.

हा उपक्रम प्रथम ओरिसा राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात येणार असून, तरूण कौशल्य उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ‘बजाज फिनसर्व्ह’ आणि ‘स्किल इंडिया’तर्फे एकत्रित प्रमाणपत्र दिले जाईल.

या कराराप्रसंगी प्रधान म्हणाले, ‘‘आर्थिक क्षेत्रातील कौशल्य विकासासाठी पूरक अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रमासंदर्भातील हे दोन करार एक अत्यंत महत्त्वाचे आहेत. जागतिक आर्थिकसेवा क्षेत्रामध्ये भारताला महत्त्वाचे केंद्र बनविण्याच्या दिशेने टाकलेले हे पुढचे पाऊल आहे.

‘बजाज फिनसर्व्ह’च्या वतीने तरुण पदवीधरांना बँकिंग, वित्तीयसेवा, विमा विषयक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे आर्थिक क्षेत्रामध्ये क्षमता निर्मितीसह तरूणांना आर्थिक क्षेत्रातील डिजिटल माध्यमांमध्ये होणाऱ्या बदलांमध्ये सहभागी होण्याकरता सक्षम केले जाईल.’’

संजीव बजाज म्हणाले, ‘‘‘एनएसडीसी’ व शिक्षण मंत्रालयाशी झालेली आमची भागीदारी तरूणवर्गाला उत्तम कौशल्यासह रोजगाराच्या उत्तम संधी मिळविण्याची संधी देईल. यामुळे ‘कुशल भारत’प्रत्यक्षात येईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT