Nithin Kamath Sakal
Personal Finance

Nithin Kamath: भारतीय लोक श्रीमंतांचा द्वेष का करतात? नितीन कामथ यांनी सांगितलं कारण; म्हणाले, आपला समाज...

Nithin Kamath on Why Indian People Hate Rich People: स्टॉक ब्रोकिंग कंपनी झिरोधाचे संस्थापक नितीन कामथ यांनी प्रश्न विचारला होता की, भारतीय लोक श्रीमंत लोकांचा द्वेष का करतात?. याला उत्तर देताना हर्ष गोएंका यांनी अतिशय गंभीर प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल शेळके

Why Indian Common People Hate Rich People? - Nithin Kamath: स्टॉक ब्रोकिंग कंपनी झिरोधाचे संस्थापक नितीन कामथ यांना प्रश्न विचारला होता की, भारतीय लोक श्रीमंत लोकांचा द्वेष का करतात? याला उत्तर देताना उद्योगपती आणि आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी अतिशय गंभीर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपले मत व्यक्त केले आहे.

Zerodha CEO नितीन कामत यांना अलीकडेच YourStory च्या संस्थापक श्रद्धा शर्मा यांनी बेंगळुरू येथे एका कार्यक्रमात हा प्रश्न विचारला होता. श्रद्धा शर्माने नितीन कामत यांना प्रश्न विचारला होता की, अमेरिकेत जर कोणी खूप पैसे कमावत असेल, जर तो खूप यशस्वी असेल आणि नवीन गाड्या विकत घेत असेल तर त्याचा फोटो कव्हर पेजवर छापला जातो. पण भारतात तसे होत नाही.

याला कामत यांनी उत्तर दिले की, अमेरिका हा शुद्ध भांडवलशाही समाज आहे. आपण भांडवलदार म्हणून मुखवटा घातलेला समाजवादी समाज आहोत. ते म्हणाले, आपण सर्व समाजवादी आहोत.

हर्ष गोएंका यांची प्रतिक्रिया काय होती?

गोयंका यांनी झिरोधाच्या सीईओच्या चर्चेचे फुटेज शेअर करून आपले मत व्यक्त केले. त्यांनी लिहिले, हा माझा दृष्टीकोन आहे: भारतीय लोक रतन टाटा, अझीम प्रेमजी आणि आनंद महिंद्रा यांसारखे चांगल्या अब्जाधीशांचे स्वागत करतात - ते त्यांच्या नम्रता, परोपकार आणि मूल्यांवर प्रेम करतात आणि त्यांचे अनुकरण करतात.

त्यांनी त्यांच्या उत्तरात पुढे लिहिले की, जे लोक संपत्तीचा दिखावा करतात, व्यवस्थेला भ्रष्ट करतात आणि सामाजिक हितापेक्षा वैयक्तिक लाभाला प्राधान्य देतात ते लोकांना आवडत नाही. समस्या पैसा नाही तो कसा वापरला जातो ही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT