Nobel winner Yunus convicted in Bangladesh labour law case Sakal
Personal Finance

नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांना न्यायालयाने सुनावली 6 महिन्यांची शिक्षा; काय आहे प्रकरण?

Bangladesh: बांगलादेशचे नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ डॉ.मुहम्मद युनूस यांना सोमवारी न्यायालयाने 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

राहुल शेळके

Bangladesh: बांगलादेशचे नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ डॉ.मुहम्मद युनूस यांना सोमवारी न्यायालयाने 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश शेख मरिना सुलताना यांनी निकाल देताना सांगितले की, त्यांच्याविरुद्ध कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे.

ग्रामीण टेलिकॉमचे अध्यक्ष म्हणून कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल युनूस यांना 6 महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात यावी, असा निर्णय न्यायमूर्तींनी दिला. युनूस यांच्यासह अन्य तीन जणांनाही न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

(Nobel winner Yunus convicted in Bangladesh labour law case)

न्यायमूर्तींनी डॉ.मुहम्मद युनूस यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. युनूस आणि इतर तिघांनी निकाल लागताच जामिनासाठी अर्ज केला. पाच हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायाधीशांनी त्यांना एक महिन्याचा जामीन मंजूर केला.

गरीबीविरोधी मोहिमेसाठी नोबेल पुरस्कार

ग्रामीण बँकेच्या माध्यमातून केलेल्या गरीबीविरोधी मोहिमेसाठी युनूस यांना 2006 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता. पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारशी त्यांचा वाद अज्ञात कारणांमुळे सुरू आहे.

2008 मध्ये हसीना सत्तेवर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी युनूस यांची अनेक प्रकरणांमध्ये चौकशी सुरू केली. त्यांच्या समर्थकांनी हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.

युनूस यांचा शेख हसीना सरकारशी वाद

पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारशी त्यांचा वाद अज्ञात कारणांमुळे सुरू आहे. ग्रामीण टेलिकॉमच्या 18 माजी कर्मचार्‍यांनी युनूस यांच्या विरोधात खटला दाखल केला आणि त्यांच्यावर नोकरीचे फायदे बळकावल्याचा आरोप केला. कामगार कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ऑगस्ट 2022 मध्ये युनूसवर खटला भरण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT