Sony Pictures Networks India Sakal
Personal Finance

NP Singh: एनपी सिंग यांनी सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाच्या एमडी आणि सीईओ पदाचा दिला राजीनामा; काय आहे कारण?

Sony Pictures Networks India: 2014 मध्ये त्यांची कंपनीचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. सिंग यांना स्पाइस टेलिकॉम, मोदीकॉर्प आणि हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यासारख्या कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे.

राहुल शेळके

Sony Pictures Networks India: एन.पी. सिंग यांनी सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (SPNI) चे MD आणि CEO पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. “माझ्या कार्यकाळात, आम्ही इंडस्ट्री बेंचमार्क प्रस्थापित केले आहेत, आमची पोहोच वाढवली आहे आणि अनेक उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. नवीन नेतृत्वाखाली यशाचा वारसा पुढे चालू राहावा,” एन.पी. सिंग यांनी सांगितले.

सिंग 1999 मध्ये कंपनीत मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांची चीफ ऑपरेशन्स ऑफिसर म्हणून पदोन्नती करण्यात आली आणि 2014 मध्ये त्यांची कंपनीचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. सिंग यांना स्पाइस टेलिकॉम, मोदीकॉर्प आणि हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यासारख्या कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे.

एनपी सिंग म्हणाले- आमच्या टीमसोबत अनेक यश मिळवल्यानंतर मी आता सामाजिक बदलावर लक्ष केंद्रित करण्यास आणि ऑपरेशनल भूमिकांकडून सल्लागार भूमिकांकडे जाण्यास तयार आहे.

जोपर्यंत हे पद स्वीकारण्यासाठी योग्य व्यक्ती मिळत नाही तोपर्यंत मी सोनी पिक्चर्सचे नेतृत्व करत राहीन. त्यासाठी आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे. योग्य व्यक्ती शोधणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे सीईओ एनपी सिंह जूनमध्ये कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी म्हणून रुजू झाले होते. यानंतर कंपनीने त्यांची जबाबदारी वाढवली आणि त्यांना एमडी आणि मुख्य कार्यकारी बनवले.

Sony Pictures Networks Indiaच्या आधी, NP सिंह यांनी Xerox, Spice Telecom, ModiCorp आणि हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यांसारख्या मोठ्या संस्थांमध्ये काम केले. एनपी सिंग यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्युत्तर पदवी घेतली असल्याची माहिती आहे. याशिवाय, ते इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे सदस्य आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT