Over 7 lakh complaints with RBI Lokpal 68 percent annual increase in FY23 Sakal
Personal Finance

RBI : रिझर्व्ह बँक लोकपालांकडे सात लाखांहून अधिक तक्रारी; आर्थिक वर्ष २०२३ मध्ये वार्षिक ६८ टक्के वाढ

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एकात्मिक लोकपालांकडे आर्थिक वर्ष २०२३ मध्ये सात लाख तीन हजार तक्रारी आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एकात्मिक लोकपालांकडे आर्थिक वर्ष २०२३ मध्ये सात लाख तीन हजार तक्रारी आल्या आहेत. आर्थिक वर्ष २०२२ च्या तुलनेत त्यात ६८.२ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटले आहे.

आर्थिक वर्ष २०२२ मध्ये तक्रारींमध्ये ९.४ टक्के वाढ नोंदवली गेली होती, तर आर्थिक वर्ष २०२१ मध्ये वार्षिक १५.७ टक्के वाढ झाली होती. त्या तुलनेत या वर्षात तक्रारींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांमधील जनजागृती आणि तक्रारी नोंदवण्याची सोपी प्रक्रिया यामुळे तक्रारी येण्याचे प्रमाण वाढले आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या एकात्मिक लोकपालाकडे आलेल्या एकूण तक्रारींपैकी २ लाख ३४ हजार तक्रारी लोकपाल कार्यालयाद्वारे हाताळल्या गेल्या आणि चार लाख ६८ हजार तक्रारी केंद्रीकृत पावती आणि प्रक्रिया केंद्राद्वारे (सीआरपीसी) निकाली काढण्यात आल्या.

या केंद्राकडे प्रत्यक्ष तक्रारी करता येतात. या तक्रारींची प्राथमिक छाननी आणि नंतर पुढील प्रक्रिया करून त्या सीएमएसवर अपलोड केल्या जातात आणि त्यानंतर विविध लोकपाल कार्यालयांना त्या वर्ग केल्या जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT