Over Rs 2 lakh cr GST evasion in FY24, almost 10 percent of collections Sakal
Personal Finance

GST Evasion: सर्वात मोठी GST चोरी; 2 लाख कोटींची फसवणूक, ऑनलाइन गेमिंग अन् कॅसिनोमध्ये सर्वाधिक हेराफेरी

GST Evasion: वस्तू आणि सेवा कर (GST) अधिकाऱ्यांनी 2023-24 मध्ये सुमारे 2.01 लाख कोटी रुपयांची करचोरी पकडली आहे. ही रक्कम 2023-24 या आर्थिक वर्षातील एकूण GST संकलनाच्या अंदाजे 10% इतकी आहे.

राहुल शेळके

GST Evasion: वस्तू आणि सेवा कर (GST) अधिकाऱ्यांनी 2023-24 मध्ये सुमारे 2.01 लाख कोटी रुपयांची करचोरी पकडली आहे. ही रक्कम 2023-24 या आर्थिक वर्षातील एकूण GST संकलनाच्या अंदाजे 10% इतकी आहे. 2023-24 या आर्थिक वर्षातील जीएसटी चोरीचा हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. गेल्या आर्थिक वर्षात जीएसटी संकलनात 11.6% ची वाढ झाली होती.

कोणत्या विभागात सर्वाधिक करचोरी झाली?

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाची गुप्तचर शाखा जीएसटी इंटेलिजेंस डायरेक्टरेट जनरल (डीजीजीआय) ने शोधून काढले की ऑनलाइन गेमिंग आणि कॅसिनो (रु. 83,588 कोटी), सह-विमा/पुनर्विमा (रु. 16,305 कोटी) आणि सेकंडमेंटमध्ये (रु. 1,064 कोटी) सर्वाधिक जीएसटी चोरी झाली आहे.

करचुकवेगिरीची एकूण 6074 प्रकरणे

FY24 अखेरपर्यंतचा डेटानुसार GST चोरीची 6,074 प्रकरणे आढळून आली आहेत, ज्यात अंदाजे 2,01,931 कोटी रुपयांचा समावेश आहे.

2022-23 या आर्थिक वर्षात जीएसटी चोरीची सुमारे 4,872 प्रकरणे आढळून आली, ज्यात 1,01,354 कोटी रुपयांचा समावेश आहे, ज्यामध्ये 20,713 कोटी रुपयांच्या ऐच्छिक पेमेंटचा समावेश आहे आणि 92 जणांना अटक करण्यात आली आहे.

ऐच्छिक पेमेंट किती होते?

करचुकवेगिरी वाढण्याबरोबरच 2023-24 या आर्थिक वर्षात ऐच्छिक कर भरणाही वाढला आहे. जीएसटीच्या ऐच्छिक पेमेंटची रक्कम 26,598 कोटी रुपये होती, जी 2023-24 या आर्थिक वर्षातील एकूण जीएसटी संकलनाच्या सुमारे 1.3 टक्के होती.

अप्रत्यक्ष कर प्रणाली अंतर्गत फसवणूक, चोरी आणि बनावट कंपन्यांच्या नोंदणीविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान, इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) किंवा बनावट ITC दावे हे GST अधिकाऱ्यांसाठी चिंतेचे प्रमुख कारण बनले आहे.

ITC फसवणुकीची सुमारे 2,200 प्रकरणे आढळून आली

FY24 मध्ये, DGGI ने सरकारी महसुलाचे नुकसान टाळण्यासाठी बनावट ITC विरुद्ध विशेष मोहीम सुरू केली. ऑपरेशनमध्ये 21,089 कोटी रुपयांच्या ITC फसवणुकीची 2,197 प्रकरणे आढळून आली, ज्यामध्ये 2,577 कोटी रुपयांचे ऐच्छिक पेमेंट होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SLW T20I: स्मृती मानधनाने रचला नवा विश्वविक्रम, शफाली वर्माचीही मिळाली साथ; भारताचा श्रीलंकेविरुद्ध विजयाचा चौकार

Pune Municipal Election : पुण्यात मोठा ट्विस्ट! मनपा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार? उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

RPI Protest : जागावाटपावरून रिपाइंची नाराजी; भाजप कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

१११ वर्षांनंतर विदर्भातील पहिला मानाचा पट पुन्हा सुरू, विदर्भ केशरी शंकरपट मैदानाची धावपट्टी गाजणार

SCROLL FOR NEXT