Gold Rate Today Esakal
Personal Finance

Gold Rate : सोने ७२ हजारांवर जाण्याची शक्यता; ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या सौरभ गाडगीळ यांचा अंदाज

सोन्याने आतापर्यंत कधीच उणे परतावा दिला नसून, यापुढेही सोन्याचे भाव कमी होतील असे वाटत नाही.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सोन्याने आतापर्यंत कधीच उणे परतावा दिला नसून, यापुढेही सोन्याचे भाव कमी होतील असे वाटत नाही. पुढील वर्षाच्या अखेरीस सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅममागे बहात्तर हजार रुपयांपर्यंत जाईल.

चांदीदेखील किलोमागे नव्वद हजार रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज ‘पीएनजी ज्वेलर्स’चे सीएमडी सौरभ गाडगीळ यांनी आज येथे व्यक्त केला. सोन्यावर सध्या पंधरा टक्के आयात कर आहे. तो कमी करावा अशी आमची मागणी आहे.

हा कर कमी झाला, तर सोने-चांदी स्वस्त होईल. चांदी ही सर्वसाधारणपणे सोन्याच्या भावाच्या कलानुसारच चालत असते. चांदीचाही पुरवठा कमी असून, तिला वाहन, सिलिकॉन इंडस्ट्रीतून मोठी मागणी आहे. त्यामुळे चांदीचेही भाव वाढतील, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला.

भारत हा जगातील सोन्याचा मोठा ग्राहक आहे. मात्र, आपण सोन्याच्या किमती निश्चित करू शकत नाही, गांधीनगर गिफ्ट सिटीत आंतरराष्ट्रीय सोने-चांदी एक्स्चेंजवरील सोन्याचे व्यवहार वाढले, की सोन्याच्या किमती निश्चित करण्यातील भारताचे स्थानही वाढेल. ‘ईटीएफ’चे खरेदीदार भारतीय सोन्याऐवजी लंडन किंवा स्वित्झर्लंडचे सोन्याचे बार मागतात.

देशात आता अशोक सोन्याचे बार तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. ते सर्वांनी स्वीकारले आणि गांधीनगरला व्यवहार वाढले, की येत्या दोन ते तीन वर्षांत भारतही सोन्याच्या किमती ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी खात्रीही गाडगीळ यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT