Life Insurance and Health Insurance sakal
Personal Finance

Life Insurance and Health Insurance : विमा हप्त्यावरील जीएसटी कमी होणार?

जीवन आणि आरोग्य विमा पॉलिसीच्या हप्त्यांवर सध्या असलेला १८ टक्के जीएसटी हा पाच टक्क्यांवर आणण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सरकारकडून जीएसटी दर रॅशनलायझेशन समितीला पाठविण्यात आल्याचे समजते.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : जीवन आणि आरोग्य विमा पॉलिसीच्या हप्त्यांवर सध्या असलेला १८ टक्के जीएसटी हा पाच टक्क्यांवर आणण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सरकारकडून जीएसटी दर रॅशनलायझेशन समितीला पाठविण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विम्याच्या हप्त्यांवरील जीएसटी कर रद्द करण्याची मागणी अर्थमंत्री सीतारामन यांना पत्र पाठवून केली होती.

जीवन आणि आरोग्य विमा पॉलिसीच्या हप्त्यावर १८ टक्के इतका जीएसटी आकारला जातो. हा कर पूर्णपणे रद्द केला जावा, अशी मागणी काही घटकांकडून केली जात असली तरी सरकार त्यादृष्टीने अनुकूल नसल्याचे समजते. पूर्ण कर रद्द करण्याऐवजी तो कमी करून पाच टक्क्यांवर आणण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करीत आहे. जीएसटी समितीची येत्या २२ तारखेला बैठक होणार असून त्यात यावर विचार होण्याची शक्यता आहे.

अर्थमंत्र्यांचे आवाहन

हप्त्यावरील कर रद्द करण्याच्या मागणीसाठी ‘इंडिया’तील पक्षांनी अलीकडेच संसदेच्या प्रांगणात निदर्शने केली होती. जीएसटीअंतर्गत प्राप्त होणारा ७३ ते ७४ टक्के पैसा राज्यांना जातो, त्यामुळे हप्त्यावरील कर रद्द करण्याची तयारी राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी दर्शवावी, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

Agriculture Day 2026: नेमका कधी आणि कसा सुरू झाला 'महाराष्ट्र कृषी दिन' ?

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

SCROLL FOR NEXT