PSU Stake Sale Sakal
Personal Finance

सरकार स्थापन होताच PM मोदी ॲक्शन मोडमध्ये येणार! IDBI बँकेसह 'या' कंपनीतील हिस्सेदारी विकणार

PSU Stake Sale: नव्याने निवडून आलेल्या सरकारच्या पहिल्या 100 दिवसांच्या अजेंड्यावर काय असेल यावर चर्चे सुरू झाली आहे. एक्झिट पोलवर विश्वास ठेवला तर पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.

राहुल शेळके

PSU Stake Sale: नव्याने निवडून आलेल्या सरकारच्या पहिल्या 100 दिवसांच्या अजेंड्यावर काय असेल यावर चर्चा सुरू झाली आहे. एक्झिट पोलवर विश्वास ठेवला तर पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. नवीन सरकार आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांत निर्गुंतवणुकीवर भर देऊ शकते. आयडीबीआय बँक आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या यादीत सर्वात वर आहेत.

सीएनबीसीने एका अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, नवीन सरकार आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांत निर्गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करू शकते. आयडीबीआय बँक आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एससीआय) या वेळी या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये सरकारचा 63.75% हिस्सा आहे. ते विकण्याचा सरकारचा विचार असू शकतो. सूत्रांनी सांगितले की एससीआयसाठी सुरुवातीला निविदा मागवल्या जाण्याची शक्यता आहे.

काही काळापासून चर्चेत असलेल्या आयडीबीआय बँकेच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया वेगवान होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अहवालानुसार ज्यांनी बँक ताब्यात घेण्यास स्वारस्य दाखवले होते त्यांच्या नावावर आरबीआय विचार करत आहे. RBI द्वारे योग्य कंपनीची छाननी केल्यानंतर, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (DIPAM) त्यावर अंतिम मान्यता देईल. सध्या सरकारकडे IDBI बँकेत 49.24% आणि LIC ची 45.48% हिस्सेदारी आहे.

कंपन्यांच्या शेअर्सची स्थिती

आज सोमवारी, इंट्राडे, IDBI बँकेचे शेअर्स 8.3 % वाढून 92.75 रुपयांवर व्यवहार करत होते, तर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे शेअर्स 6.5 % वाढून 261.80  रुपयांवर व्यवहार करत होते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT