Quant MF-Sebi Probe Saga Sakal
Personal Finance

Quant MF: क्वांट म्युच्युअल फंडात पैसे गुंतवलेत; SIP सुरू ठेवावी की फंडातून बाहेर पडावे? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला

Quant MF-Sebi Probe Saga: क्वांट म्युच्युअल फंड एका वर्षात 80 टक्क्यांपर्यंत परतावा देतो तो आता अडचणींचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीही या फंडात पैसे गुंतवले असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

राहुल शेळके

Quant MF-Sebi Probe Saga: एका वर्षात 80 टक्क्यांपर्यंत परतावा देणारा क्वांट म्युच्युअल फंड आता अडचणींचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीही या फंडात पैसे गुंतवले असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. क्वांट फंड हाऊसवर सेबीच्या कारवाईनंतर त्यात पैसे गुंतवलेल्या लोकांना चिंता आहे की, पैसे काढायचे की ठेवायचे? अनेक गुंतवणूक सल्लागार यावर आपले मत मांडत आहेत. त्यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया.

तज्ञांचे मत काय आहे?

म्युच्युअल फंड व्यवस्थापक आणि राईज अँड शाईन कंपनीचे संचालक विनायक भोईटे यांचे मत आहे की, गुंतवणूकदारांनी याबाबत काळजी करण्याची गरज नाही. कारण म्युच्युअल फंड हाऊसेस अप्रत्यक्षपणे गुंतवणुकदाराचे पैसे बाजारात लिस्ट असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवतात. त्यामुळे जोपर्यंत त्या कंपन्यांना तोटा किंवा नफा होत नाही तोपर्यंत गुंतवणूकदारांना त्याचा फटका बसणार नाही. त्यामुळे गुंतवणूकदाराने आपला गुंतवणुकीचा प्रवास संयमाने सुरू ठेवावा.

फंड हाऊसवर सुरू असलेल्या तपासाबाबत मार्केट तज्ज्ञ पुनीत किनरा सांगतात की, गुंतवणूकदार सध्या वेट अँड वॉचचे धोरण अवलंबत आहेत. अशा स्थितीत त्यांनी तपास पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी.

तपास पूर्ण झाल्यावरच गुंतवणूकदारांनी याबाबत निर्णय घ्यावा. या व्यतिरिक्त, बहुतेक गुंतवणूक सल्लागारांचे असेही म्हणणे आहे की त्यांनी अद्याप स्वतःहून रिडम्प्शनची (पैसे काढण्याची) कोणतीही प्रक्रिया सुरू केलेली नाही.

अनेक तज्ज्ञ असा सल्ला देतात की गुंतवणूकदाराने नेहमी त्याच्या पोर्टफोलिओमधील वेगवेगळ्या श्रेणींच्या वेगवेगळ्या फंडांमध्ये पैसे गुंतवले पाहिजेत. याचा अर्थ तुमचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण असावा.

अशा प्रकारे फ्रेंड रनिंग केले जाते

क्वांट म्युच्युअल फंडवर फ्रंट-रनिंगचा आरोप आहे, ज्याच्या संदर्भात सेबीने क्वांट म्युच्युअल फंडावर कठोर कारवाई केली आहे. फ्रंट रनिंग ही एक बेकायदेशीर पद्धत आहे ज्याद्वारे फंड मॅनेजरला आगामी मोठ्या ट्रेडबद्दल आधीच माहिती असते आणि या आधारावर ते आधी ऑर्डर देतात आणि नफा मिळवतात. दुसऱ्या शब्दांत, शेअर्सच्या वाढीचा फायदा घेऊन झपाट्याने पैसे कमवण्याचा हा बेकायदेशीर मार्ग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT