Inflation  sakal
Personal Finance

Retail inflation: महागाईपासून किंचित दिलासा! किरकोळ महागाईच्या दरात नोंदवली गेली घट

दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या भावानं महागाईचा भडका उडण्यास मदत झाली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशभरात खाद्यपदार्थ आणि भाज्यांच्या किंमतीत काहीशी घट झाल्यानं महागाईत किंचित घट झाली आहे. सरकारच्या माहितीनुसार, जुलै महिन्याचा किरकोळ महागाईचा दर जुलै महिन्याच्या ७.४४ टक्क्यांच्या तुलनेत ६.८३ टक्के इतका राहिला. (Retail inflation at 6.83 perc in August as compared to 7.44 perc in July 2023)

टोमॅटोचा राहिला प्रभाव

टोमॅटोच्या भावानं जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कहर केला होता. १५० ते २०० रुपये किलो दरानं विकला गेल्यानं टोमॅटोला सोन्याचा भाव आला होता. याच काळात भाज्यांचे दरही गगनाला भिडले होते. पण ऑगस्टच्या शेवटी टोमॅटोचा भाव नियंत्रणात यायला लागला त्यामुळं किरकोळ महागाईत घट नोंदवली गेली आहे. (Latest Marathi News)

ग्रामीण-शहरी महागाईतही घट

दरम्यान, सरकारी आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये खाद्य महागाईचा दर ११.५१ टक्क्यांहून ९.९४ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. ग्रामीण भागातील महागाईचा दर ७.६३ टक्क्यांवरुन ७.०२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर शहरी महागाईचा दर ७.२० टक्क्यांहून ६.५९ टक्क्यांवर पोहोचला. कोअर अर्थात सर्वसामान्य महागाईच्या दरातही घट झाली असून तो ४.९ टक्क्यांवरुन ४.८ टक्क्यांपर्यंत किरकोळ खाली आला आहे. (Marathi Tajya Batmya)

औद्योगिक उत्पादनात वाढ

त्याचबरोबर देशातील औद्योगिक उत्पादनात (IIP) जुलै महिन्यात ५.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएसओच्या आकडेवारीनुसार, औद्योगिक उत्पादन निर्देशांकांच्या (IIP) मोजल्या जाणाऱ्या औद्योगिक उत्पादनात गेल्यावर्षी याच महिन्यात २.२ टक्के वाढ झाली. तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जुलै २०२३ मध्ये ४.६ टक्के वाढ झाली. तर मायनिंग उत्पादनात १०.७ टक्के आणि वीज उत्पादनात ८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

Mumbai: रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

SCROLL FOR NEXT