Ashwini Vaishnaw  esakal
Personal Finance

Vishwakarma Scheme: विश्वकर्मा योजनेअंतर्गत 5% व्याजासह 1 लाख रुपयांपर्यंत मिळणार कर्ज

Vishwakarma Scheme: मोदी मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली आहे.

राहुल शेळके

Vishwakarma Scheme: 77व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना कारागीरांसाठी 'विश्वकर्मा योजना' जाहीर केली. मोदी मंत्रिमंडळाने बुधवारी या योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना विशिष्ट शैलीतील कुशल कामगारांसाठी असेल.

तिचे पूर्ण नाव PM 'विश्वकर्मा कौशल सन्मान योजना' किंवा 'PM विकास योजना' (PM विश्वकर्मा कौशल सन्मान योजना - PM VIKAS) आहे. या योजनेचे बजेट 2023 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात ठेवण्यात आले होते.

'विश्वकर्मा योजने'मध्ये 13 ते 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. विश्वकर्मा योजनेंतर्गत कमाल 5% व्याजासह 1 लाख रुपये कर्ज दिले जाणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा पूजेच्या निमित्ताने 'विश्वकर्मा योजना' सुरू करण्यात येणार आहे. हाच दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाढदिवस आहे.

'विश्वकर्मा योजने'चा उद्देश कौशल्य प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिक सहाय्य देऊन देशभरातील कारागीर आणि कारागीरांच्या क्षमता वाढवणे हा आहे. या योजनेअंतर्गत कुशल कारागिरांना एमएसएमईशी जोडले जाईल, जेणेकरून त्यांना चांगली बाजारपेठ मिळू शकेल.

योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

सुतार, सोनार, शिल्पकार आणि कुंभार या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळणार आहे. याद्वारे कारागिरांच्या उत्पादनांचा आणि सेवांचा दर्जा वाढविण्याचा तसेच त्यांना देशांतर्गत बाजारपेठ आणि जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

"पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत, कारागीर यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्रे, ओळखपत्र, क्रेडिट सपोर्ट ₹ 1 लाख (पहिल्या टप्प्यात) आणि ₹ 2 लाख (दुसऱ्या टप्प्यात) 5% सवलतीच्या व्याजदराद्वारे मान्यता दिली जाईल.'' केंद्राने एका निवेदनात म्हटले आहे.

"पीएम विश्वकर्मा" अंतर्गत पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेल्यांमध्ये सुतार, बोट बनवणारे, लोहार, कुलूप बनवणारे, सोनार, कुंभार, शिल्पकार आणि गवंडी यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT