investment
investment  sakal
Personal Finance

Investment : सुरक्षित गुंतवणूक करायची आहे ? मग हे वाचाच...

सकाळ वृत्तसेवा

रिकरिंग डेपॉझिट (Recurring Deposit) ही स्कीम एक प्रकारे पिग्गी बँकेसारखी आहे, ज्यामध्ये तुम्हाला दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागते आणि मॅच्युरिटीनंतर व्याजासह रक्कम मिळते. रिकरिंग डेपॉझिटमध्ये एकरकमी रक्कम गुंतवता येत नाही. अशा परिस्थितीत, आरडीद्वारे दरमहा एक निश्चित रक्कम जमा करून, ते पैसे वाचवू शकता आणि नफा मिळवू शकतात.

आरडी ही सरकारी हमी योजना आहे आणि ती बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये सर्वत्र उपलब्ध आहे. तुम्हाला ही योजना बँकांमध्ये 1 वर्ष ते 10 वर्षांच्या कालावधीत मिळेल आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार टेन्‍युअर निवडू शकता. पण जर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये आरडी सुरू करायची असेल, तर तुम्हाला ती 5 वर्षांसाठी करावी लागेल. पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या आरडीवर तुम्हाला खूप चांगले व्याज मिळते. तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर पोस्ट ऑफिस आरडी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.

पोस्ट ऑफिस आरडी फक्त 100 रुपयांपासून सुरू करता येते. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. तुम्हाला पोस्ट ऑफिस आरडीवर चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. सध्या 6.7% व्याजदर आहे. व्याज दर तिमाहीत मोजले जाते. अशा परिस्थितीत तुम्हाला 5 वर्षात व्याजाच्या स्वरूपात चांगला नफा मिळतो. तुम्ही पोस्ट ऑफिस आरडीमध्ये दर महिन्याला 5,000 रुपये जमा केल्यास, 5 वर्षांत तुमच्याकडे 3 लाख जमा होतील. यावरील व्याज 6.7 टक्के दराने मोजले तर व्याजाची रक्कम 56,हजार 830 रुपये होईल. म्हणजेच तुम्हाला एकूण 3,56,830 रुपये मॅच्‍युरिटीनंतर मिळतील.

पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या रिकरिंग डेपॉझिट योजनेत तुम्ही सलग 12 हप्ते जमा केल्यास तुम्हाला कर्जाची सुविधा मिळते. म्हणजेच या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला किमान एक वर्ष सतत रक्कम जमा करावी लागेल. एका वर्षानंतर, तुम्ही तुमच्या खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 50 टक्के पर्यंत कर्ज घेऊ शकता. तुम्ही कर्जाची रक्कम एकरकमी किंवा समान मासिक हप्त्यांमध्ये भरू शकता.

आरडी खात्याची मॅच्‍युरिटी 5 वर्ष आहे. पण, प्री-मॅच्युअर क्लोजर 3 वर्षांनी करता येते. त्यात नॉमिनेशनचीही सोय आहे. त्याच वेळी, मॅच्युरिटीनंतर, आरडी खाते पुढील 5 वर्ष चालू ठेवता येते. पोस्ट ऑफिस आरडी अकाउंटमध्ये एखादी व्यक्ती कितीही खाती उघडू शकते. यामध्ये सिंगल व्यतिरिक्त जास्तीत जास्त 3 व्यक्तींसाठी जॉइंट अकाउंट उघडता येते. लहान मुलाच्या नावाने खाते उघडण्याचीही सोय आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितच्या 'त्या' गंभीर आरोपावर स्टार स्पोर्ट्सचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'क्लिपमध्ये फक्त...'

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT