Harsh Goenka Sakal
Personal Finance

Indian Billionaire: 32,615 कोटींची संपत्ती अन् देतोय 600 रुपये वाचवण्याचा सल्ला; कोण आहे हा उद्योगपती?

Indian Billionaire Harsh Goenka: भारतीय उद्योगपती हर्ष गोयंका यांच्या एका पोस्टने इंटरनेटवर चर्चेला उधाण आले आहे. उद्योगपतीने आपल्या एक्स पोस्टद्वारे 3 लहान आणि चांगल्या सवयी सांगितल्या होत्या.

राहुल शेळके

Indian Billionaire Harsh Goenka: भारतीय उद्योगपती हर्ष गोयंका यांच्या एका पोस्टने इंटरनेटवर चर्चेला उधाण आले आहे. उद्योगपतीने आपल्या एक्स पोस्टद्वारे 3 लहान आणि चांगल्या सवयी सांगितल्या होत्या. एका टिप्समध्ये त्यांनी लोकांना दररोज 600 रुपये वाचवण्याचा सल्ला दिला. नेटकऱ्यांनी त्यांच्या सल्ल्यावर जोरदार टीका केली आहे.

नेटकरी म्हणाले की, देशात प्रत्येकाला रोज 600 रुपयेही कमावता येत नाहीत, तिथे ते इतके रुपये कसे वाचवणार? दुसरीकडे, नेटकरी इतके पैसे वाचवण्यासाठी चांगला पगार असण्याचीही चर्चा करत आहेत. हर्ष गोयंका यांच्या पोस्टवर यूजर्सचे रिप्लाय सध्या व्हायरल होत आहेत.

कमेंट सेक्शनमध्ये यूजर्स या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिले की, घरातील काम सोडून ऑफिसमध्ये किंवा घरी कधी पुस्तके वाचावीत. दुसरा म्हणाला रोजची बचत कशी करणार तुम्हाला रोज पगार मिळतो का?

दररोज 600 रुपये वाचवण्याचा सल्ला

हर्ष गोयंका यांनी 19 सप्टेंबर रोजी मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट लिहिली. ज्यामध्ये त्याने 3 सवयींबद्दल सांगितले होते. ते लिहितात की जर तुम्ही रोज 600 रुपये वाचवले तर ते एका वर्षात 2,19,000 रुपये होईल. दररोज 20 पाने वाचून तुम्ही एका वर्षात सरासरी 30 पुस्तके वाचू शकता. दररोज 10,000 पावले चालल्याने, तुम्ही दरवर्षी 70 मॅरेथॉन धावू शकाल.

कोण आहेत हर्ष गोयंका?

हर्ष गोयंका यांचा जन्म 25 डिसेंबर 1957 रोजी प्रतिष्ठित गोयंका कुटुंबात झाला. त्यांचे वडील आर.पी. गोयंका यांनी आरपीजी ग्रुपची स्थापना केली, हा ग्रुप सुरुवातीला कृषी उपकरणांचा व्यवसाय करत होता. हर्ष गोयंका यांना उद्योजकतेचा वारसा मिळाला आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते कौटुंबिक व्यवसायात सामील झाले.

1983 मध्ये 24 वर्षे 6 महिन्यांच्या तरुण वयात CEAT चे व्यवस्थापकीय संचालक बनले. 1988 मध्ये ते RPG ग्रुपचे चेअरमन झाले आणि त्यांनी त्यांच्या वडिलांची जबाबदारी घेतली. हर्ष गोयंका यांनी 80 आणि 90 च्या दशकात समूहाचे विलीनीकरण आणि अधिग्रहण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या त्यांच्याकडे 32615 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

SCROLL FOR NEXT