Services sector growth slows in February job placement HSBC India services survey Sakal
Personal Finance

Service Sector Growth : सेवा क्षेत्राची वाढ फेब्रुवारीमध्ये मंद

व्यवसायिक उलाढाली आणि नोकऱ्यांमधील वाढीचे प्रमाण कमी असल्याने फेब्रुवारीमध्ये देशातील सेवा क्षेत्राची वाढ मंदावल्याचे मासिक सर्वेक्षणात आढळून आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : व्यवसायिक उलाढाली आणि नोकऱ्यांमधील वाढीचे प्रमाण कमी असल्याने फेब्रुवारीमध्ये देशातील सेवा क्षेत्राची वाढ मंदावल्याचे मासिक सर्वेक्षणात आढळून आले आहे. एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेसने या सर्वेक्षणाचा अहवाल आज जाहीर केला.

एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस बिझनेस ॲक्टिव्हिटी इंडेक्सनुसार, फेब्रुवारीमधील सेवाक्षेत्राचा निर्देशांक ६०.६ नोंदवला. जानेवारीमध्ये तो ६१.८ होता. भारतातील सेवाक्षेत्राच्या पर्चेस मॅनेजर इंडेक्सवरून (पीएमआय) सेवा क्षेत्रातील वाढीचा वेग जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये कमी झाला आहे, असे एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेसचे अर्थशास्त्रज्ञ इनेस लॅम म्हणाले.

या सर्वेक्षणानुसार, व्यवसायिक उलाढाली कमी झाल्या मात्र, ऐतिहासिकदृष्ट्या त्यातील वाढ उत्तम होती. भारतातील सेवा कंपन्यांसह परदेशातील नवा व्यवसाय सलग तेराव्या महिन्यात वाढला. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांनी ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप, अमेरिका आणि ‘यूएईम’धील नफ्याचा अहवाल दिला.

फेब्रुवारीमध्ये वर्षभराच्या पुढील दृष्टिकोनाबाबत व्यावसायिक आत्मविश्वास कमकुवत झाला. तरीही, जवळपास २६ टक्के कंपन्यांना वाढीचा अंदाज आहे आणि केवळ दोन टक्के कंपन्यांनी घसरणीचा अंदाज व्यक्त केला आहे.

‘‘नव्या ऑर्डर आणि आउटपुटमधील वाढीतील मंदीमुळे, सेवा कंपन्यांचा भविष्यातील व्यावसायिक उलाढालींबाबतचा दृष्टिकोन किंचित कमकुवत झाला. सेवांसाठी आकारण्यात आलेल्या किमती २४ महिन्यांतील सर्वांत कमी दराने वाढल्या कारण महागाई कमी झाली. रोजगाराच्या आघाडीवर, कंपन्यांनी नोकऱ्या निर्माण केल्या. परंतु, क्षमतेवरील दबाव कमी करणे आणि दृष्टीकोनातील कमी आत्मविश्वास यामुळे रोजगारातील वाढ कमी झाली,’’ असेही लॅम म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs NZ: पाकड्यांशी भिडायला किवींनी संघात १, २ नव्हे तर ३ बदल केले, पण पावसाने सगळे गणितच बिघडवले! आता पुढचे समीकरण काय?

Pune Traffic : सायलेन्सर व ड्रिंक ॲण्ड ड्राईव्हविरोधात वाहतूक शाखेची कारवाई; ३४८ बुलेटस्वरांकडून तीन लाख ३४ हजार रुपयांचा दंड वसूल

Trump Tariff: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डोनाल्ड ट्रम्प भारताकडून किती टॅरिफ आकारणार? हा कर फक्त १५० दिवसांसाठी का लादला?

२०२४ ला डेटिंगची चर्चा, २०२५ मध्ये नातं जगजाहीर; आता शिखर धवनने आयरिश प्रेयसीसोबत लग्न केलं, सोफी शाइन आहे तरी कोण? पाहा फोटो

रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; तासन् तास उशिरा धावतात पॅसेंजर गाड्या; प्रवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण

SCROLL FOR NEXT