Success Story Irfan Razack  Sakal
Personal Finance

Success Story: टेलर दुकानापासून बनवली 12 हजार कोटींची कंपनी; बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक

Irfan Razack Net Worth: इरफान रझाक हे देशातील सर्वात मोठा व्यावसायिक समूह प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. इरफान रझाक यांचा जन्म बेंगळुरूमधील एका मुस्लिम कुटुंबात झाला.

राहुल शेळके

Irfan Razack Net Worth: इरफान रझाक हे देशातील सर्वात मोठा व्यावसायिक समूह प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. इरफान रझाक यांचा जन्म बेंगळुरूमधील एका मुस्लिम कुटुंबात झाला आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट होण्याचा त्यांचा प्रवास नेत्रदीपक आहे.

त्यांचे वडील रझाक सत्तार यांनी कपड्यांचे छोटेसे दुकान उघडल्यानंतर प्रेस्टीज ग्रुपची स्थापना केली. कंपनीचा प्रवास 1950 मध्ये बेंगळुरू येथून सुरू झाला. टेलरच्या दुकानापासून ते बिलियन डॉलर कंपनीपर्यंतचा प्रवास कसा होता ते जाणून घेऊयात.

रझाक यांच्या नेतृत्वाखाली, प्रेस्टीज इस्टेट हा भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रातील एक प्रतिष्ठित समूह म्हणून उदयास आला आहे. कंपनीचा व्यवसाय निवासी, व्यावसायिक, किरकोळ अशा विभागांमध्ये पसरलेला आहे. कंपनीने आतापर्यंत 285 प्रकल्प पूर्ण केले आहेत.

देशातील सर्वात मोठी लिस्टेड मालमत्ता कंपनी

इरफान रझाक आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती आता 1 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट ग्रुपचे शेअर्स 60 टक्क्यांनी वाढले आहेत.

कंपनीच्या अफाट यशामुळे, ती देशातील सर्वात मोठी लिस्टेड मालमत्ता कंपनी बनली आहे आणि आता फक्त DLF तिच्या पुढे आहे.

प्रतिष्ठेच्या मालमत्तेबद्दल बोलायचे झाल्यास, समूहाकडे Apple, Caterpillar, Armani आणि Louis Vuitton सारख्या जागतिक ब्रँड्ससारखे सुप्रसिद्ध भाडेकरू आहेत.

1990 मध्ये बेंगळुरूमधील आपला दुसरा रिअल इस्टेट प्रकल्प विकल्यानंतर, रझाक यांनी लवकर निवृत्ती घेण्याचा विचार केला. परंतु त्यांची सर्जनशीलता आणि व्यवसायाची आवड यामुळे त्यांनी प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट्सचे रिअल इस्टेट पॉवरहाऊसमध्ये रूपांतर केले.

बेंगळुरू व्यतिरिक्त, प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट चेन्नई, कोची, कालिकत, हैदराबाद आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये देखील व्यवसाय करते. कंपनी मध्यमवर्गीय खरेदीदारांवर लक्ष केंद्रित करते आणि 2019 पर्यंत कंपनीने तिची वार्षिक विक्री चौपट केली होती.

बेंगळुरूमध्ये कपडे आणि टेलरिंगचे दुकान

रझाक यांचे धाकटे भाऊ रिझवान आणि नोमान यांचाही कौटुंबिक व्यवसायात महत्त्वाचा वाटा आहे. दोघेही कंपनीच्या यशात आणि वाढीस हातभार लावत आहे. रझाक कुटुंबाची व्यवसायाबद्दलची आवड यावरून स्पष्ट होते की ते अजूनही बेंगळुरूमध्ये त्यांचे कपडे आणि टेलरिंगचे दुकान चालवतात.

व्यवसायासोबतच रझाक यांना साहसी खेळांचीही आवड आहे. एका छोट्या कपड्यांच्या दुकानापासून ते अब्ज डॉलर्सच्या रिअल इस्टेटच्या साम्राज्यापर्यंतचा त्यांचा प्रवास त्यांची दृष्टी, मेहनत आणि समर्पण थक्क करणारे आहे.

इरफान रझाक यांची एकूण संपत्ती

इरफान रझाकची एकूण संपत्ती 1.3 अब्ज डॉलर आहे. ते देशातील सर्वात यशस्वी आणि प्रभावशाली उद्योगपतींपैकी एक आहेत. फोर्ब्सने त्यांना श्रीमंत भारतीयांच्या यादीत 77 व्या क्रमांकावर ठेवले आहे. प्रेस्टीज इस्टेट प्रकल्पांचे यश, वाढ आणि नावीन्यपूर्ण उपक्रम यामुळे रझाक हे देशभरातील नवोदित व्यावसायिकांसाठी प्रेरणास्थान आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील पाच महान फलंदाजांमध्ये ना विराट कोहली, ना रोहित शर्मा; इंग्लंडच्या जो रूटचे मात्र नाव, कोणी केलीय निवड?

Train Accident : एक्सप्रेस ट्रेनच्या धडकेत ४०० मेंढ्याचा मृत्यू, रुळावरुन वाहिला रक्ताचा पाट, कोल्ह्यांचा कळपावर हल्ला अन्...

Artificial Intelligence Updates: AI माणसांसाठी पर्याय, पण चिंता वाढलीय | Sakal NEWS

Video : 'तू हफ्ता कसा देत नाही बघतो' म्हणत पोलिसांनी विक्रेत्याला केली बेदम मारहाण; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही पाहा

Latest Marathi News Updates : पुण्यात उद्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीची कार्यशाळा

SCROLL FOR NEXT