TCS Dividend Sakal
Personal Finance

TCS Dividend : टिसीएस आपल्या शेअरहोल्डर्सना देणार 10 रुपयांचा डिविडेंड...

Tata Consultancy Services rs 10 dividend : टाटा ग्रुपची आयटी कंपनी टाटा कंसल्टेंसी सर्विसेजने (Tata Consultancy Services) आर्थिक वर्ष 2025 च्या एप्रिल-जून तिमाहीच्या आर्थिक निकालांसह शेअरहोल्डर्ससाठी अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

TCS : टाटा ग्रुपची आयटी कंपनी टाटा कंसल्टेंसी सर्विसेजने (Tata Consultancy Services) आर्थिक वर्ष 2025 च्या एप्रिल-जून तिमाहीच्या आर्थिक निकालांसह शेअरहोल्डर्ससाठी अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. कंपनीच्या बोर्डाने प्रत्येक शेअरवर 1 रुपाया फेस व्हॅल्यू असलेल्या 10 रुपयांचा अंतरिम लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे असे कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला सांगितले आहे.

हा डिव्हिडेंड सोमवार 5 ऑगस्टला दिला जाईल. याची रेकॉर्ड डेट 20 जुलै 2024 आहे. या तारखेपर्यंत ज्या शेअरहोल्डर्सची नावे कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजच्या नोंदींमध्ये शेअर्सचे मालक म्हणून दिसतात ते लाभांश प्राप्त करण्यास पात्र असतील.

एप्रिल-जून तिमाहीत टाटा कंसल्टेंसी सर्विसेजचे कंसोलिडेटेड कुल आय अर्थात एकत्रित एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर 63,575 कोटी झाले, जे एका वर्षापूर्वी 60,778 कोटी होते. या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर वाढून 12,105 कोटी झाला आहे. जून 2023 च्या तिमाहीत तो 11,120 कोटी होते.

1 जुलै रोजी टाटा कंसल्टेंसी सर्विसेजचे शेअर्स बीएसईवर 0.33 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह 3922.70 रुपयांवर बंद झाले. गुरुवारी हा शेअर सकाळी 3944.65 रुपयांवर तेजीसह उघडला. दिवसभरात तो 3979.90 रुपयांचा उच्चांक आणि 3895.70 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. कंपनीचे मार्केट कॅप 14.19 लाख कोटी आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT