Tirupati Laddu Row Sakal
Personal Finance

Tirupati Laddu Row: तिरुपती मंदिरात तूप पुरवणाऱ्या एआर डेअरीचा मालक कोण? काय करते कंपनी?

Tirupati Laddu Row: आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये तुपाऐवजी माशांचे तेल आणि प्राण्यांच्या चरबीचे तेल वापरण्यात आल्याने वाद वाढला आहे. एआर डेअरी कंपनी मंदिरात लाडू तयार करण्यासाठी तूप पुरवत असे.

राहुल शेळके

Tirupati Laddu Row: आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये तुपाऐवजी माशांचे तेल आणि प्राण्यांच्या चरबीचे तेल वापरण्यात आल्याने वाद वाढला आहे. एआर डेअरी कंपनी मंदिरात लाडू तयार करण्यासाठी तूप पुरवत असे, कंपनीने स्पष्टीकरण देत आरोप फेटाळून लावले आहेत. जून आणि जुलैमध्ये ही बाब उघडकीस आल्याचे एआर डेअरी प्रॉडक्ट्सचे म्हणणे आहे.

तिरुपती मंदिर ट्रस्टने जुलैमध्ये गुजरातच्या प्रयोगशाळेत तुपाचे नमुने पाठवले होते, ज्याचा अहवाल 18 सप्टेंबरला आला होता. ऑगस्ट 2023 मध्ये जगन सरकारने स्वतः तेलंगणाच्या एआर डेअरी कंपनीला तूप पुरवण्याचे काम दिले होते.

यापूर्वी कर्नाटक कोऑपरेटिव्ह मिल्क फेडरेशन (KMF) कंपनीचा नंदिनी ब्रँड तूप पुरवत होता. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी तत्कालीन जगन मोहन रेड्डी सरकारवर भेसळयुक्त तूप वापरल्याचा आरोप केला आहे. यावर्षी अनियमितता उघडकीस आल्यानंतर त्यांनी ऑगस्टमध्ये एआर डेअरीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून पुन्हा नंदिनी ब्रँडकडे जबाबदारी दिली.

एआर डेअरी प्रॉडक्ट्सने सांगितले की, ही बाब जून आणि जुलैमध्ये उघडकीस आली. आम्ही तिरुपती मंदिराला 0.1% देखील तूप पुरवले नाही. मान्यतेनंतर चार टँकर (तूप) देण्यात आले. त्यांनी पैसे दिले. त्यांनी पाचव्या टँकरबाबत तक्रार केली आहे.

आम्ही त्याला आव्हान दिले आहे. नामांकित NAPL लॅबमध्ये चाचणी करून आणि Agmark प्राधिकरणाने प्रमाणित केल्यानंतरच आम्ही टँकर पाठवत आहोत. प्रकरण राजकीय केले जात आहे.

कंपनीचा मालक कोण?

तामिळनाडूमधील एआर डेअरी प्रॉडक्ट्स कंपनी 1995 मध्ये सुरू झाली आणि कंपनीच्या वेबसाइटनुसार, राजसेकरन आर, सुरिया प्रभा आर आणि श्रीनिवासन एसआर हे तीन संचालक कंपनीचे व्यवस्थापन करतात.

दिंडीगुल येथे असलेल्या कंपनीने पीटीआयला सांगितले की त्यांनी फक्त जून आणि जुलै महिन्यात तिरुपती मंदिर ट्रस्टला तुपाचा पुरवठा केला होता.

कंपनीचे संचालक राजसेकरन आर यांनी सांगितले, आम्ही तुपासाठी फक्त गाईचे दूध वापरतो. प्रत्येक बॅचची चाचणी केली जाते आणि आमच्याकडे प्रयोगशाळेतील अहवाल आहेत. आम्ही तयार केलेले तूप योग्य चाचणीनंतरच पाठवले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT