Unemployment Rate rises to 6 point 7 percent in urban areas government data  Sakal
Personal Finance

Unemployment Rate: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरांमधील बेरोजगारीचा दर वाढला; पण महिलांची स्थिती सुधारली

Unemployment Rate: ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांबद्दल बोलायचे झाल्यास, जानेवारी-मार्चमध्ये पुरुषांसाठी बेरोजगारीचा दर 6.1% पर्यंत वाढला, जो ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये 5.8% होता. महिलांबाबत बोलायचे झाले तर या काळात महिलांची बेरोजगारी कमी झाली आहे.

राहुल शेळके

Unemployment Rate: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच लेबर फोर्स सर्व्हेची आकडेवारी बुधवारी समोर आली. त्यानुसार मागील तिमाहीच्या तुलनेत बेरोजगारीचा दर वाढला आहे. यामध्ये शहरी पुरुषांची बेरोजगारी अधिक वाढली आहे. 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींच्या बेरोजगारीत वाढ झाली आहे. शहरी भागातील बेरोजगारीचा दर जानेवारी-मार्च दरम्यान 6.7% पर्यंत वाढला आहे, जो ऑक्टोबर-डिसेंबर 2023 दरम्यान 6.5% होता.

पुरुषांची बेरोजगारी वाढली, स्त्रियांची परिस्थिती सुधारली

ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांबद्दल बोलायचे झाल्यास, जानेवारी-मार्चमध्ये पुरुषांचा बेरोजगारीचा दर 6.1% पर्यंत वाढला, जो ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये 5.8% होता.

महिलांबाबत बोलायचे झाले तर या काळात महिलांची बेरोजगारी कमी झाली आहे. ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये 8.6% असलेला बेरोजगारीचा दर जानेवारी-मार्च दरम्यान 8.5% पर्यंत कमी झाला.

22व्या पीरियडिक लेबर फोर्स सर्व्हे (PLFS) नुसार, मार्च 2024 मध्ये शहरी भागात 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी बेरोजगारीचा दर 6.7% होता. डेटावरून असेही दिसून आले आहे की शहरी भागातील 15 वर्षांवरील महिलांमधील बेरोजगारीचा दर जानेवारी-मार्च 2024 मध्ये 8.5 टक्क्यांवर घसरला आहे, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 9.2 टक्के होता. एप्रिल-जून 2023 मध्ये तो 9.1% आणि ऑक्टोबर-डिसेंबर 2023 मध्ये 8.6% होता.

पुरुष बेरोजगारी दर किती?

पुरुषांमधील शहरी भागातील बेरोजगारीचा दर मार्च तिमाहीत वाढून 6.1% झाला आहे, जो एका वर्षाच्या आधीच्या याच कालावधीत 6% होता. एप्रिल-जून 2023 मध्ये तो 5.9%, जुलै-सप्टेंबर 2023 मध्ये 6% आणि ऑक्टोबर-डिसेंबर 2023 मध्ये 5.8% होता.

काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढली

आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की शहरी भागात 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या काम करणाऱ्यांची संख्या (कामगार शक्ती सहभाग दर) वाढला आहे. त्याचा दर ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 49.9% होता, जो जानेवारी-मार्चमध्ये वाढून 50.2% झाला.

जर आपण पुरुषांबद्दल बोललो तर त्यांचा सहभाग दर 74.1% वरून 74.4% पर्यंत वाढला. तर महिलांचा सहभाग दर 25% वरून 25.6% पर्यंत वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Market Yard : भाजीपाला व्यापारी व सभापती यांच्यात जोरदार वाद, कोल्हापूर बाजार समितीमध्ये प्रकार; नेमकं काय प्रकरण?

Pro Kabaddi 12: यू मुंबावर युपी योद्धाज पडले भारी! पराभवामुळे टॉप-४ ची संधीही हुकली

Ayurvedic Tips for Heart: हृदयविकाराचा झटका येऊच नये यासाठी काय करावे? वाचा आयुर्वेद काय सांगत

Mumbai News: तिसऱ्या मुंबईसाठी सिडकोसारखे धोरण! बाधितांना मोबदल्यात भूखंडही देणार

Video : अर्जुन करणार सायलीच्या आई - वडिलांची डीएनए टेस्ट ! "अरे इतका स्लो वकील कसा असू शकतो ?" प्रेक्षक भडकले

SCROLL FOR NEXT