Union Budget 2024 esakal
Personal Finance

Union Budget 2024 : अर्थमंत्र्यांनी रद्द केला Angel Tax, पण हा नक्की कसला कर आहे?

What is Angel Tax : सरकारचा असं म्हणणं होतं की एंजल टॅक्स सुरू केल्याने मनी लॉन्ड्री सारख्या गोष्टींना आळा घालता येऊ शकतो.

सकाळ डिजिटल टीम

Union Budget 2024 :

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या बजेटची घोषणा केली आहे आज संसदेत त्यांनी बजेट मधील काही महत्त्वाचे मुद्दे आणि नवीन घोषणा केल्या आहेत अर्थमंत्र्यांनी सांगितलं की एंजल टॅक्स हे पूर्णपणे रद्द केल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितलं. एंजल टॅक्स रद्द करण्यात आला आहे. तुम्हाला एंजल टॅक्स बद्दल काही माहिती आहे का. एंजल टॅक्स काय आहे तो कशासाठी घेतला जात होता याबद्दल अधिक माहिती घेऊयात.

एंजल टॅक्स ला देशात 2012 पासून लागू करण्यात आला होता. हा टॅक्स अनलीस्टेड व्यवसायांवरती आकारण्यात येत होता.  जे गुंतवणूकदार शेअर बाजारात नोंदणी कृत नसलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात त्यांना एंजल इन्वेस्टर म्हटले जाते.

शेअरच्या बाजार मूल्यापेक्षा जास्त दराने त्या कंपनीने गुंतवणूकदारांना शेअर्स विकल्यास त्यामधला फरक असलेली रक्कम ही त्या कंपनीचे उत्पन्न म्हणून धरण्यात येत होती या अतिरिक्त भांडवलावर कर भरावा लागत होता त्याला एंजल टॅक्स म्हणतात. (Union Budget 2024 )

असे व्यवसाय एंजल गुंतवणूकदारांकडून फंडिंग घेत होते. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादा स्टार्टअप बिजनेस एखाद्या एंजल गुंतवणूकदाराकडून फंड घेतो. तेव्हा त्या फंडा वरती हा करआकारण्यात येतो. ही संपूर्ण प्रक्रिया आयकर अधिनियमन 1961 च्या कलम 56 2 (Vii) ब अंतर्गत केली जात होती. पण आज निर्मला सीतारामन यांनी हा टॅक्स आता बंद करण्यात येत असल्याची घोषणा केली.

हा कर का लावण्यात आला होता

सरकारचा असं म्हणणं होतं की एंजल टॅक्स सुरू केल्याने मनी लॉन्ड्री सारख्या गोष्टींना आळा घालता येऊ शकतो. तसेच या टॅक्स पद्धतीमुळे सर्व प्रकारच्या व्यवसायांना कर देयकांच्या अंतर्गत आणले गेले. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील अनेक व्यवसायिकांना नुकसान सहन करावा लागत होतं. त्यामुळेच हा टॅक्स बंद करण्यात यावा अशी मागणी गेल्या काही वर्षापासून होत होती.

खरी अडचण तर तेव्हा असायची जेव्हा एखाद्या व्यवसायाला मिळणारी गुंतवणुक ही व्हीएफएम म्हणजे फेअर मार्केट व्हॅल्यू पेक्षाही अधिक आसायची. त्यामुळे या व्यवसायिकांना त्यांच्या गुंतवणुकीवर 30 टक्क्यांहून अधिक कर भरावा लागत होता.

आता मोदी सरकारने हा कर रद्द केला आहे. त्यामुळे देशातील नव्या स्टार्टअप्सना याचा फायदा होईल, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या काही वर्षापासून स्टार्टअपची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्याकर पद्धतीमुळे या व्यवसायिकांना तोटाच होत होता. पण आता ही कर पद्धतीच बंद करण्यात आली आहे. त्यामुळे याचा फायदा व्यवसायिकांना नक्की होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT