US invests 553 million Dollar in Gautam Adani's Sri Lanka port to counter China's influence  Sakal
Personal Finance

Gautam Adani: चीनचे वर्चस्व कमी करण्यासाठी अदानींना अमेरिकेचा पाठिंबा; श्रीलंकेत बंदर बांधण्यासाठी देणार 55 कोटी डॉलर

Gautam Adani: श्रीलंकेतील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिकेने अदानी समूहा सोबत करार केला आहे.

राहुल शेळके

Gautam Adani: गौतम अदानी यांच्या बाबात एक मोठी बातमी समोर आली आहे. श्रीलंकेतील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिकेने अदानी समूहा सोबत करार करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे बंदर टर्मिनल बांधण्यासाठी गौतम अदानी यांना 553 दशलक्ष डॉलर्सची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण आशियातील चीनचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी हा एक प्रकारे अप्रत्यक्ष करार आहे. कोलंबोच्या वेस्ट कंटेनर टर्मिनलचा विकास करण्यासाठी गौतम अदानींना इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनकडून ही रक्कम मिळणार आहेत. अमेरिकन सरकारी संस्था इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनची आशियातील सर्वात मोठी पायाभूत गुंतवणूक म्हणता येईल.

अमेरिकेने जगभरातील पायाभूत सुविधांमध्ये केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. अमेरिकेच्या डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनचे म्हणणे आहे की यामुळे श्रीलंकेतील आर्थिक व्यवहारांना चालना मिळण्यास मदत होईल.

त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यात अधिक चांगला समन्वय साधणे शक्य होणार आहे. श्रीलंकेतील बंदर विकसित करण्यासाठी गौतम अदानी यांना दिलेला हा निधी अलीकडच्या काळात श्रीलंकेतील चीनच्या वाढत्या प्रभावामुळे अमेरिका त्रस्त असल्याचेही सूचित आहे.

अमेरिकन गुंतवणूक कंपनीने 2023 मध्ये आतापर्यंत 9.3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. चीनने गेल्या वर्षी श्रीलंकेत 2.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. श्रीलंकेतील ही सर्वात मोठी थेट विदेशी गुंतवणूक आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की चीन श्रीलंकेला कर्जाच्या जाळ्यात अडकवत आहे आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर खूप विपरीत परिणाम होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT