Truong My Lan Real Estate
Truong My Lan Real Estate Sakal
Personal Finance

Truong My Lan: जगातील सर्वात मोठी फसवणूक! अब्जाधीश महिलेला न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा; काय आहे प्रकरण?

राहुल शेळके

Truong My Lan Real Estate: व्हिएतनामने ट्रुओंग माय लॅन यांना आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली आहे. रिअल इस्टेट टायकून ट्रुओंग माय लॅन यांना दक्षिण व्हिएतनामच्या हो ची मिन्ह शहरातील न्यायालयाने गुरुवारी देशातील सर्वात मोठ्या आर्थिक फसवणूक प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली.

सरकारी मीडिया ‘थॅन निएन’ने ही माहिती दिली. रिअल इस्टेट कंपनीचे 67 वर्षीय चेअरमन व्हॅन थिन्ह फॅट यांच्यावर 12.5 अब्ज डॉलर्सची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ही रक्कम देशाच्या 2022 च्या GDP च्या 3 टक्के आहे.

लॅनने 2012 ते 2022 दरम्यान सैगॉन जॉइंट स्टॉक कमर्शिअल बँकेवर बेकायदेशीरपणे नियंत्रण ठेवले आणि हजारो शेल कंपन्यांद्वारे हा निधी वळवला. तसेच सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिली. यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचाही लॅनवर आरोप आहे. लॅनला ऑक्टोबर 2022 मध्ये अटक करण्यात आली होती.

व्हॅन थिन्ह फॅट ही व्हिएतनाममधील सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीकडे निवासी बांधकाम, कार्यालये, शॉपिंग सेंटर्स आणि हॉटेल्स आहेत. अंदाजे 1,300 कंपन्या 2023 मध्ये व्हिएतनामच्या रिअल इस्टेट मार्केटमधून बाहेर पडल्या आहेत, ज्यामुळे या क्षेत्राला मोठा धक्का बसला.

सरकारी माध्यमांनुसार, कंपन्या खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी सवलती आणि भेटवस्तू म्हणून सोने देत आहेत. हो ची मिन्ह सिटीमधील दुकानाचे भाडे कमी असूनही, शहराच्या मध्यभागी अनेक मालमत्ता रिकाम्या आहेत. व्हिएतनामचे दिग्गज राजकारणी, कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस गुयेन फु ट्राँग यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये म्हटले होते की भ्रष्टाचारविरोधी मोहीम "दीर्घ काळ सुरू राहील."

85 जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी 85 जणांवर खटला चालवला जात आहे, त्यात स्टेट बँक ऑफ व्हिएतनामच्या एका माजी अधिकाऱ्याचा समावेश आहे, ज्यावर 5.2 दशलक्ष डॉलर्सची लाच घेतल्याचा आरोप आहे. भ्रष्टाचार कारवाईचा भाग म्हणून लॅन आणि इतर 85 लोकांना अटक करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: बंगालमध्ये वाद पेटला, TMC-ISF समर्थकांमध्ये हाणामारी, भाजपचा आरोप- पराभवाच्या भीतीने हिंसाचार

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT